त्या पालकाचे आरोप बिनबुडाचे

त्या पालकाचे आरोप बिनबुडाचे
शंकरपूर (जगदीश पेंदाम)


देवराव चौधरी या पालकानी आमच्या कॉन्वेन्ट वर केलेला आरोप हा बिनबूडाचा असून यात कुठल्याही प्रकारचे सत्य नाही. पालकाचा कुठेतरी गैर समज झाला व आमच्या कॉन्वेन्ट ला बदनाम करण्याच्या हेतूने हा सर्व प्रकार दुसऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आला असावा असे मत संचालक राजेश भांडारकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
               मागील 19 वर्षापासून आम्ही ग्यलेक्सी कॉन्वेन्ट शंकरपूर या नावाने कॉन्वेन्ट चालवीत असून या वर्षी नर्सरी, के. जी. 1, के. जी. 2, व एक तें सहा वर्ग आहेत यात या सत्रात एकूण 164 विद्यार्थी असून आज पर्यंत आम्ही एकाही पालकाला पैशासाठी जबरदस्ती केली नाही. आमच्या परिसरात शेतकरी व शेतमजूर यांचे मुले आमच्या शाळेत आहेत व आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे याची जाणीव आहे. त्यामुळे आमच्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत.
          कुं. ओजस प्रणय चौधरी हा मुलगा या वर्षी के.जी. 2 ला आमच्याच शाळेत  असून याच्या पालकांनी एकूण फी सहा हजार पैकी दिवाळी पर्यंतची जी  शाळेची फी तीन हजार भरावयाची होती ती भरलेले आहे त्यामुळे त्याला पैशासाठी साठी वर्ग खोलीत डांबुन ठेवल्याचा आरोप हा पूर्णतः खोटा आहे. तो विध्यार्थी आमच्याच शाळेत असून त्याच्या पालकांनी त्याला नियमित शाळेत पाठवावे असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित संचालक  राजेश आर. भांडारकर, मुख्याध्यापक आरती राजेश भांडारकर, वर्ग शिक्षका शिवरकर व शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
        याबाबत गट शिक्षणाधीकारी प. स. चिमूर  श्री. किशोर पिसे यांना विचारणा केली असता अशी  तक्रार माझ्या पर्यंत अजून आली नसून वृत्तपत्रात बातमी आल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!