एकनाथ बुध्दे यांच्या हास्य कल्लोळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

एकनाथ बुध्दे यांच्या हास्य कल्लोळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन


गडचिरोली (प्रतिनिधी) -  
 झाडीबोली साहित्य मंडळाचे ज्येष्ठ  कार्यकारिणी सदस्य कवी एकनाथ बुध्दे यांच्या हास्यकल्लोळ या विनोदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच गडचिरोलीत संपन्न झाले. पुर्णतः झाडीबोली भाषेतील असलेल्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशनाच्या प्रसंगी ज्येष्ठ कवयित्री सौ. कुसूमताई अलाम, रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , जिल्हाप्रमुख डाॕ. चंद्रकांत लेनगुरे, कवी प्रमोद राऊत, भोजराज कान्हेकर, सौ.  प्रमिला अलोणे, मारोती आरेवार, संजिव बोरकर, कमलेश झाडे, पुरूषोत्तम ठाकरे आदींची उपस्थिती होती. 
विसोरा निवासी एकनाथ बुध्दे यांचा हा पाचवा काव्यसंग्रह असून झाडीबोलीत आहे. बोलीशब्दाचा सुरेख उपयोग करीत बुध्दे यांनी ९० विनोदी कविता साकारल्या आहेत. विनोदी शैलीत झाडीपट्टीतील अस्सल ग्रामजीवन झाडीबोली काव्यातून मांडण्याचा बुध्दे यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे बंडोपंत बोढेकर यांनी मत व्यक्त केले तर   ह्या काव्यसंग्रहातील सर्वच कविता विनोदातून जनप्रबोधन करणाऱ्या असल्याचे मत सौ. अलाम यांनी व्यक्त केले. प्रास्तविकपर मनोगत डाॕ. लेनगुरे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन  भोजराज कान्हेकर यांनी केले. आभार मारोती आरेवार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!