आरोग्य समितीच्या आजच्या बैठकीवर मूल शहर वासीयांची नजर
आरोग्य समितीच्या आजच्या बैठकीवर मूल शहर वासीयांची नजर
घनकचरा कंत्राटावर आज आरोग्य समितीची कसोटी!
वादग्रस्त निविदेवर समितीची भूमिका काय? मूलकरांचे लक्ष आजच्या बैठकीकडे
मूल | प्रतिनिधी
मूल नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त निविदेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑगस्ट) आरोग्य समितीची बैठक उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा विषय हा थेट आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या निविदेवर जाचक अटी, 'इंडस्ट्रियल वेस्ट'चा समावेश, मजुरांची कपात, किमान वेतन कायद्याबाबत उपस्थित झालेले प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून ती वादाच्या केंद्रस्थानी आहे.
अशा परिस्थितीत आजच्या आरोग्य समितीच्या बैठकीत या वादग्रस्त घनकचरा निविदेबाबत कोणती भूमिका घेतली जाते आणि समिती कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण मूल शहराचे लक्ष लागले आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारितील या महत्त्वाच्या विषयावर समिती प्रशासनाला जाब विचारणार की मौन बाळगणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!