वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार - रोवणीच्या काळात शेतकरी दहशतीत

 

सावली - तालुक्यातील सामदा येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोवणीच्या कामासाठी शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, सामदा येथील शेतकरी हिरामण साखरे वय (६२) नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करुन बाजूला असलेल्या तलावात गुरे चरण्यासाठी गेले असता अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सोबत असलेल्या शेतकऱ्याने दिली असता वन  विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याच भागात मागील महिन्यात हत्तीने हल्ला करुन एका व्यक्तीस ठार केले. वाघ, बिबट, हत्ती व डुकराच्या दहशतीत शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेती करावी लागत आहे. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!