कोळसा खाणी साठी अधीग्रहण शेतजमिनिला 30लाखरूपये प्रती एकर मोबदला द्या

आमदार करण देवतळे यांची केंद्रीय कोळसा व खान मंत्री किशन रेड्डी यांच्या कडे मागणी                         

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वामध्ये घेतली भेट 

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांच्या व बेरोजगारांच्या समस्या व शेतजमिनीला 30 लाख रुपये प्रती एकर भाव मिळावा यासाठी दिल्ली येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार श्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वामध्ये आमदार करण देवतळे यांनी केंद्रीय कोळसा व खान मंत्री जी किशन रेड्डी यांना दिल्ली येथे भेटून निवेदन दिले.कोल इंडिया col india आणि वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड WCL च्या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्या माननीय केंद्रीय मंत्री यांच्याकडे मांडण्यात आल्या जमीन संपादनाचा योग्य मोबदला आणि नोकरी मिळण्याबाबतच्या विविध समस्यावर यावेळी सफल चर्चा करण्यात आली. तसेच जमीन संपादनाचा मोबदला नोकरीसह प्रति एकरी 30 लाख रुपये करण्यात यावा ही प्रलंबित मागणी लावून धरत त्यासंबंधीच्या इतर महत्त्वाच्या सूचना केंद्रीय मंत्र्याकडे करण्यात आल्या यासोबतच केपीसीएल आणि अरबिंदो या खाजगी कंपन्याकडून स्थानिक लोकांची होणारी पिळवणूक ,रखडलेल्या नोकऱ्या ,प्रलंबित मोबदला, पुनर्वसन आणि वेतनाचे प्रश्न या तक्रारीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड केपिसीएल आणि अरबिंदो कंपनीकडून होत असलेले अवैध खणन कराराचे उल्लंघन आणि अधिक उत्पादनातून होणारी अफरातफर यासारख्या गंभीर प्रकाराची कोल कंट्रोलर मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या सर्व समस्या व तात्काळ तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे डब्ल्यूसीएलची विशेष बैठक आयोजित करावी अशी मागणी हंसराज अहिर व आमदार करण देवतळे यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!