राजस्थानचे सायकल चालक अंकित अरोरा यांचा सायकल स्नेही मंडळातर्फे गौरव
राजस्थानचे सायकल चालक अंकित अरोरा यांचा सायकल स्नेही मंडळातर्फे गौरव
गडचिरोली (प्रतिनिधी )-
गेल्या २६ महिन्यापासून संपूर्ण भारतात सायकल द्वारा भ्रमंती करणारे अंकीत अरोरा यांचा सायकल स्नेही मंडळातर्फे श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिरात गौरव करण्यात आला.अंकित हा अजमेर( राजस्थान ) निवासी असून देशातील विविध कलासंस्कृती ,जीवनपद्धती चा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ते भ्रमण करीत आहे. काही दिवस ते चंद्रपूर जिल्हातील अड्याळटेकडी येथे थांबून थोर कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य द्रारा निर्मित तेथील ग्रामकुटूंब , भूवैकुंठ प्रयोगाचा अभ्यास केला . गडचिरोली शहरात आलेल्या अंकित ने सायकल स्नेही मंडळाच्या आजवरच्या कार्यावर समाधान व्यक्त करून शुभकामना दिल्यात . अंकीतच्या सत्काराप्रसंगी सेवामंडळाचे जिल्हाप्रमुख डाॕ. शिवनाथजी कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , भोजराज कान्हेकर , दलितमित्र नानाजी वाढई, पंडित पुडके, अरूण भोसले, उध्दव डांगे , संदीप कटकुरवार आदी मंडळी उपस्थित होते ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!