चिमूर तहसिल मध्ये विना चाकाची ट्रॅक्टर जप्त


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर तहसिल मध्ये विना चाकाची ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याची चर्चा सध्या चिमूर शहरात सर्वत्र सुरू असून तहसिलदारांवर काळिमा फासणारी हि बाब आहे.
पटवारी अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात वाहन जप्त करून ठेवत असून तहसिल कार्यालयातून ट्रॅक्टर ची चाके चोरीला गेली असावी अशी मते दर्शवित आहे. महसूल विभाग झोपी गेला असा यावरुन स्पष्ट होतांना दिसत आहे.
तर या ट्रॅक्टर ची चाके चोरीला गेली असेल तर गोर - गरीब जनतेच्या दस्तावेजाचं काय ? याकडे तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!