आदर्श ग्रामव्यवस्थेची सूत्रे ग्रामगीता ग्रंथात - बंडोपंत बोढेकर

आदर्श ग्रामव्यवस्थेची सूत्रे ग्रामगीता ग्रंथात  - बंडोपंत बोढेकर 
पोर्ला येथे ग्रामगीता वाचन सप्ताहात जनप्रबोधन 


गडचिरोली (प्रतिनिधी) - राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी दैनंदिन    सामुदायिक प्रार्थना  उपासना  सांगीतली. तसेच ग्रामगीता ग्रंथाची निर्मिती केली.या माध्यमातून त्यांनी ग्रामसमाजव्यवस्थेचा  विचार मजबूत केला. अनेकांना अंतर्बाह्य  स्वच्छतेचे धडे दिले. सामुहिक कृतीतून विकासाच्या प्रक्रियेला गती येत असते हा तत्त्वविचार रूजविला.  समाजमनाला या पध्दतीने  वळवून स्वतःचे कल्याण  स्वतः करण्याचा संतबोधावर आधारीत रचनात्मक विचार कृतीत उतरविला, असे प्रतिपादन, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.पोर्ला येथे  आयोजित ग्रामगीता  सप्ताहात सांयकाळी प्रार्थना प्रसंगी ते बोलत होते. पोर्ला  येथील  शिव मंदिर  सभागृहात आयोजित   तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृतीप्रित्यर्थ   ग्रामगीता वाचन सप्ताहात प्रभात गुंजन च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती विलासराव दशमुखे 
  ग्रामगिता वाचक  डोमाजी झरकर, ग्रामसेवाधिकारी केशवराव दशमुखे, नामदेव महाराज, विनोद दशमुखे, नरहरी हरडे, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे, गजानन दशमुखे, पांडुरंग सुर्यवंशी , सुधिर सुरणकर, रामदास मलोडे, येवले महाराज, रुषी मंगर, मारोती तिवाडे,  सौ. सिंधुताई दशमुखे, वच्छलाबाई दशमुखे, विमलबाई दशमुखे, सौ. लता दशमुखे, सौ. योगिता  दशमुखे,  आदी उपस्थित होते. दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेनंतर सुमधुर भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!