मूलभूत गरजेपैकी घरकुल हि प्राथमिक गरज - उपसभापती शांताराम सेलवटकर
मूलभूत गरजेपैकी घरकुल हि प्राथमिक गरज
- उपसभापती शांताराम सेलवटकर
आवास दिन निमित्य घरकुल लाभार्थी मेळावा
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - मानवी जीवनातील मूलभूत गरजा असून त्यात अन्न वस्त्र निवारा असून यातील निवारा साठी घरकुल ही महत्वाची गरज असल्याने पंचायत समिती स्तरावरून शासनाच्या विविध योजने अंतर्गत घरकुल वाटप केले जात असून गावातील ज्या लाभार्थ्यांना घरकुल ची आवश्यकता आहे. आदिवासी साठी शबरी,अनुसूचित जातींना रमाई योजना अश्या माहिती देऊन योजनेतील लाभ देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध असल्याचे पस उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी केले. चिमूर पंचायत समिती येथील सभागृहात आवास दिन निमित्य कार्यक्रमात उपसभापती शांताराम सेलवटकर बोलत होते.यावेळी सभापती विद्या चौधरी पस सदस्य पुडलीक मते पस सदस्य नर्मदा रामटेके, आरोग्य विस्तार अधिकारी सोरदे , सांख्यिकी विस्तार अधिकारी विनोद ननावरे गृहनिर्माण अभियंता चांदेवार ,बाबरे , रामटेके, जाधव कांबळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रफुल करपे यांनी करीत चिमूर पंचायत समिती मध्ये शबरी विकास योजनेचे 650, रमाई योजने चे 1130, पंतप्रधान योजने 1250 घरकुल मंजूर झाल्याचे सांगत त्या मंजूर प्राप्त लाभार्थ्यांनी घरकुल कामे सुरू करणार असल्याचे सांगितले.
संचालन सोरदे तर आभार रामटेके यांनी केले.तालुक्यातील सरपंच व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!