चिमुर तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांमध्ये असंतोष

चिमुर तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांमध्ये असंतोष
 
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर तालुका क्रुषी विभागाकडून शेत कऱ्यांना हरभरा (चना) पिकाचे प्रमाणित बियाने मिळत नसल्याने शेतकऱ्यांनमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सविस्तर व्रुत्त या प्रमाणे आहे की नेरी व परिसर खरीप पिकासाठी धान,आणी रब्बी पिकासांठी हरभरा याचे पिक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आता शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपला आहे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी शासन स्तरावरून अनुदान तत्वावर हरभरा चना मिळण्याकरिता चिमुर तालुका क्रुषी कार्यालयाचे उंबरठे झिझवितांना दिसून येत आहे तरीही शेतकऱ्यांना हरभरा (चना)मिळुन येत नाही.
यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणीत बियानासाठी २ हजार ६२२ क्विंटलचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे तरीही मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध  होत नसल्याने शेतकऱ्यांना मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष खदखदत आहे.याबाबत तालुका क्रुषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रमाणित हरभरा चना कधी मिळणार असे विचारले असता एक दोन दिवसात हरभऱ्याची गाडी येणार आहे असे सांगितले जात आहे मात्र दहा बारा दिवसाचा कालावधी लोटुन गेला तरीही गाडी आली नाही त्यामुळे पाणी कुठे मुरत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे  येथे पहिल्या टप्प्यात काहीसा हरभरा वाटप करण्यात आला ,दुसऱ्या टप्प्यात मात्र शेतकरी चातक पक्षा प्रमाणे हरभरा बियानाची वाट बघत आहे काही शेतकऱ्यांना परमिट सुद्धा वाटप करण्यात आले आहे वेळ निघून गेल्यावर चना उपलब्ध होणार का? कारण जमीनीचा ओलावा सुकु लागला आहे त्यामुळे त्वरीत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
   याबाबत शेतकऱ्यांनी चना कधी उपलब्ध होणार असे विचारले असता उद्याला नक्की गाडी येणार आहे असे कार्यालयीन अधिकारी गोंधडी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!