महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कार्यक्रम.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कार्यक्रम.
मूल (प्रकाश चलाख)
मुलाचे हक्क व सुरक्षितता या उपक्रमांतर्गत 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत मूल तालुक्यातील मौजा हळदी येथे ग्राम समाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत जनजागृतीपर सप्ताह साजरा करून उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्रा पं हळदी येथे दिनांक
21/11/2019 रोजी मुलांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह (14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2019) औचित्य साधून श्री. मनोज शेरकी मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिकशाळाहळदीयांच्याअध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी श्री सोमनाथ कोल्हे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक ग्रा पं हळदी यांच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडला. या प्रसंगी सौ निखाते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच लैंगिक शोषण, बालगुन्हेगारी, बालमजुरी, शिक्षणाचा हक्क यासंदर्भात इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर गुन्हेगारी व शोषण थांबवण्या संदर्भात शिक्षकांनाही खास मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या सप्ताहात मुख्याध्यापक श्री मनोज शेरकी, सौ,निखाते मॅडम व इतर शिक्षक वृंद मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक सोमनाथ कोल्हे श्री. सुधीर लेनगुरे, युवा प्रतिनिधी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!