निसर्गाचा चमत्कार ---बकरिने दिले चारही पाय नसलेल्या पिलुला जन्म

निसर्गाचा चमत्कार ---बकरिने दिले चारही पाय नसलेल्या पिलुला जन्म


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
पृथ्वीवर निसर्गात अनेक चमत्कार नेहमीच पहायला मिळत असतात आणि हया चमत्काराना पाहुन कुतूहल निर्माण होऊन कुठली तरी अदभुत शक्ति धरतीवर अस्तिवात असल्याची अनुभूति होते अशीच एक घटना धरतीवर प्राणिमात्रात पहावयास मिळाली आहे एका बकरिने बिन पायाच्या  पिलुला जन्म देऊन निसर्ग शक्तिचा अदभुत चमत्कार दाखविला आहे.


               ही घटना नेरी वरुन जवळ असलेल्या शिवनपायली येथील आहे शेतकरी हरिदास पोइनकर यांच्या मालकीच्या बकरिने एकही पाय नसलेल्या पिलुला जन्म दिला आहे निसर्गाचा या घटनेमुळे परिसरात कुतूहल निर्माण होऊन अनेक नागरिक या पिलुला बघण्यासाठी गर्दी करीत आहेत याला निसर्गाचा चमत्कारच म्हणावे लागेल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!