आंबोली येथे आमचं गाव आमचं विकास कार्यशाळेचे आयोजन
आंबोली येथे आमचं गाव आमचं विकास कार्यशाळेचे आयोजन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक.१९/११/२०१९ ला चिमूर तालुक्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत मौजा आंबोली येथे "आमचं गाव आमचं विकास"अंतर्गत गण स्तरीय कार्यशाळा चे आयोजन आंबोली येथे दिनांक १९/११/१९ या तारखेला येथील ग्राम पंचायत च्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली त्या कार्यशाळेला उपस्थित श्री,ममताताई डुकरे जिल्हा परिषद सद्यस्य चंद्रपूर , हुमने वि. अ. चिमूर , अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम यांनी कार्यशाळा करिता उत्तम मार्गदर्शन करून यशस्वी केले. तसेच मा श्री,संजय पुरी गट विकास अधिकारी यांनी कार्यशाळेचे नियोजन, मार्गदर्शन,आदेशनव्ये पंचायत समिती गण आंबोली अंतर्गत येथिल ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य , ग्रामस्तरीय कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, आशा वर्कर,, अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते.
कार्यशाळेला सन्माननीय जि.प. सदस्य ममताताई डुकरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उत्तम नियोजन व व्यवस्था ग्रामपंचायत आंबोली यांनी केले. यासाठी सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्यांचे व ग्राम सेवक सर ,संगणक परिचक शिवरकर,ग्राम पंचायत कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांचे या कार्यशाळेला सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!