प्राचार्य सदानंद लोखंडे यांना आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान
प्राचार्य सदानंद लोखंडे यांना आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर प्रसिद्ध कवी,लेखक प्राचार्य सदानंद लोखंडे यांना थायलंड येथे संपन्न झालेल्या पहिल्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात संमेलनाचे उद्घाटक मलेशिया येथील सुप्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक डी.के.पंजामूर्ती,प्रमुख अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधिश के.जी.बालकृष्णन्,संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार अमर साबळे,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,संमेलनाध्यक्ष प्रा.दिपककुमार खोब्रागडे यांचे हस्ते आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन प्राचार्य लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य लोखंडे यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ॲड.भूपेशकुमार पाटील,सुरेश डांगे,प्रल्हाद बोरकर,रामदास राऊत,प्रकाश मेश्राम,मनोज राऊत आदींनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!