राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे रा.ज. बोढेकर साहित्य पुरस्कार घोषित
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे रा.ज. बोढेकर साहित्य पुरस्कार घोषित
चंद्रपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे दिवंगत रा.जं. बोढेकर स्मृती साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रात प्रयत्नरत राहून उपक्रमशील कार्य करणाऱ्या व्यक्तीनां प्रस्तुत पुरस्कार देण्यात येते. यावर्षी या पुरस्काराकरीता उध्दवराव ढवस( चंद्रपूर ) , कवी सुरेश डांगे(चिमूर ), कवी अरूण झगडकर( गोंडपिपरी ) , कवयित्री सौ. सविता कोट्टी सातपुते (चंद्रपूर ),कवयित्री ॲड. सारिका जेनेकर ( राजुरा ),कवयित्री अर्जुमन शेख( बल्लारपूर ) यांची निवड करण्यात आलेली आहे. परिषदेचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच सभा झाली. त्यात ही घोषणा करण्यात आलेली आहे. गेल्या दहा वर्षापासून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. परिषदेचे कार्यकारीणी सदस्य विलासराव उगे,ॲड. राजेंद्र जेनेकर , प्रा. श्रावण बानासुरे , प्राचार्य पत्रे, संजय वैद्य , भाऊराव बोबडे , नामदेव गेडकर , सुनिल नाथे, सतिश लोंढे, कार्तिक चरडे , श्रीकांत प्रतापवार , विलासराव चौधरी , नारायण सहारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .या सन्मानाचे वितरण येत्या १४ डिसेंबर ला करण्यातयेईल



छान उपक्रम!
उत्तर द्याहटवा