ब्रह्मपुरी शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत
ब्रह्मपुरी शहर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत
ब्रम्हपुरी : - ब्रम्हपुरी शहरात संविधान दिनाचे औचित्य साधून चौका - चौकात सी.सी.टिव्ही कॅमेरे लावणे सुरू आहे तशी प्राथमिक तयारी सुरू असतांना. यापुढे ब्रम्हपुरी शहरामध्ये चौका - चौकात प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद होणार असून संपूर्ण ब्रम्हपुरी शहर सी.सी. टिव्ही कॅमेराच्या निगरानित राहणार आहे.ब्रह्मपुरी शहर सामाजिक ,सांस्कृतिक, वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात नावारूपास आलेले असून बऱ्याच जिल्ह्यातून येथे उपचारासाठी तसेच शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात व मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असल्याकारणाने दळणवळणाच्या सोयी मुबलक मोठ्या प्रमाणावर आहे .
त्यामुळे सतत हलचल मोठ्या प्रमाणात जनतेची सुरु असते यात काही प्रमाणात अनुचित प्रकार सुद्धा घडू शकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.म्हणून
त्यामुळे सतत हलचल मोठ्या प्रमाणात जनतेची सुरु असते यात काही प्रमाणात अनुचित प्रकार सुद्धा घडू शकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.म्हणून
ब्रह्मपुरी शहर शांत व प्रिय असले तरी संभाव्य धोके लक्षात घेऊन शहरात किरकोळ चोरी , भरधाव वेगाने धावणारे वाहन ,विद्यार्थ्यांचे स्टंटबाजी ,छेडछाड प्रकरण आधी गुन्हे घडू शकतात या अनुषंघाने त्यावेळेस पोलीस प्रशासनाला संबंधित गुन्ह्याची तपास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने शहरात प्रत्येक चौकात सी.सी.टिव्ही कॅमेरे लागले की बऱ्याच घटना वर अंकुश लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावता येते .त्याचबरोबर रात्री अपरात्री येणाऱ्या जानाऱ्याना या कॅमेराच्या निगराणीत स्वतःला सुरक्षित असल्याची खात्री होत असते.सी.सी.टिव्ही कॅमेऱ्याची नजर ब्रम्हपुरी शहरावर राहणार असल्याने वाहनधारकांवर वचक राहीलच परंतु शहरातील ख्रिस्तानंद चौक, शिवाजी चौक, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे चौक येथील वाहतुकीची कोंडी कशी निर्माण होते हे कॅमेऱ्यात कैद होणारच त्यावर पोलीस प्रशासनाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा करून ब्रह्मपुरी शहरात सी.सी. टिव्ही कॅमेरा लागल्याने सामान्य नागरिकांकडून संपूर्ण पोलीस प्रशासनाचे कौतुक व अभिनंदन सुद्धा केले जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!