उद्धव ठाकरे मुख्यमंत्री-मूल येथे जल्लोष
मूल (सोमेश्वर रेड्डीवार)
आज मुल तालुका शिवसेनेतर्फे गांधी चौक मुल येथे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांच्या नेतृत्वात फटाके व आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला त्यानिमीत्ताने मुल तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते या आनंदाच्या सोहळ्यात मिठाई व फटाके वाटुन आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी सुनिल काळे , महेश चौधरी , भास्कर खोब्रागडे, संदिप चिताडे ,ओमदेव मोहुर्ले आदि शिवसैनिक हजर होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!