प्रा.राम राऊत यांचा "ग्रामगीताचार्य" पदवी मिळाल्याबद्दल सत्कार व भानुदास पोपटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
प्रा.राम राऊत यांचा "ग्रामगीताचार्य" पदवी मिळाल्याबद्दल सत्कार व भानुदास पोपटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,चिमूर व बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आज दि.२४ नोव्हेंबरला चिमूर जि.चंद्रपूर येथे मा.प्रा.राम राऊत सर यांना ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल शाल,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कवी भानुदास पोपटे यांच्या वीरांगणा मुगदाबाईची अभंगवाणी या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.महादेवराव पिसे होते.
कार्यक्रमात ॲड.भूपेश पाटील यांनी सामाजिक कार्य,साहित्य चळवळ यावर विस्तृत विवेचन केले.भानुदास पोपटे यांच्या पुस्तकावर हरी मेश्राम यांनी भाष्य केले. संचालन रावन शेरकुरे यांनी केले. प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले.आभार रामदास कामडी यांनी मानले.कार्यक्रमाला कवी,लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!