इको प्रो ची मांडव गोठ्याला भेट.

इको प्रो ची मांडव गोठ्याला भेट...


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
                येथून जवळच असलेल्या हिरापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या  मांडवगोटा येथे इको प्रो च्या चमूने भेट देऊन पाहणी केली.
          आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला हा मृतक घर महापाशान  युगातील असून सलग एकाच दगडावर बनलेला आहे.  हा मांडव गोटा बावीस हजार वर्ष पुरातन असून शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळांनी शोधलेला आहे.
            या मांडव गोट्याला  चंद्रपूर जिल्हा परिक्रमा ऐतिहासिक वारसा संरक्षण, संवर्धन, स्वच्छता अभियान जनजागृती अभियानात   इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात पंचवीस  सदस्यांनी भेट दिली त्यांच्या चमूचे स्वागत करण्यात आले तसेच  या मांडव गोठ्याची माहिती तरुण पर्यावरण वादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकर यांनी समजाऊन दिली.  यावेळी तरुण पर्यावरणवादी मंडळाचे अध्यक्ष  वीरेंद्र हिंगे, संतोष कोरडे, जगदीश पेंदाम यांची उपस्थिती होती.
          यासंदर्भात बंडू धोत्रे बोलले की, चंद्रपूर जिल्ह्यातले जेवढे ऐतिहासिक वारसा स्थळ आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होणे व संवर्धन करणे नितांत गरजेचे  आहे जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती प्राप्त होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!