पळसगांव (पि) येथील पुरगस्तचा अद्याप मुक्काम शाळेतच घर मिळण्यासाठी आज केली जिल्हा वारी
पळसगांव (पि) येथील पुरगस्तचा अद्याप मुक्काम शाळेतच घर मिळण्यासाठी आज केली जिल्हा वारी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना घरे देण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. मात्र याबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने पळसगांव (पि) येथील ४० कुटुंबांनि अतिवृष्टी धारकाची घरकुल व आर्थिक मदत मिळण्याकरिता आज दिनांक 25 /11/2019 ला जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्या करीता आज पळसगाव (पी)ता चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील कुटुंबायांनी आपल्या हक्कचे घर मिळण्याकरिता आज जिल्हा वारी केली
दिनांक 4/9/2019 पडलेल्या अति मुसळधार पाऊस व गावालगत ची बोडी फुटल्यामुळे पुरामध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. घरात पाणी शिरल्याने जवळपास 40 घरे पूर्णतः व 122 घरे अशनता जमीनदोस्त झाले आहेत त्यांचे मोठे नुकसान झालं आहे. पूर ओसरल्यानंतर ही घरं पूर्णतः धोकादायक झाली आहे.
या धक्कातून सावरण्यासाठी आज पळसगाव येथील कुटुंब नि हक्कच निवारा घर आर्थिक मदत करिता आज दिनाकं 25/11/2019 ला मा,जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आज सर्व पूरग्रस्त कुटुंबणी आपली समस्यांवर निवेदन देण्याकरिता आज जिल्हाधिकारी साहेब यांना व जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी यांना आपल्या निवेदण देण्याकरीता त्यांचा दालनात आज जिल्हा परिषद वारी करण्यात आली,
पुरामध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झालं आहे. पूर ओसरल्यानंतर ही घरं धोकादायक झाली आहे. त्यामुळे सरकारने त्यांना पक्की घरं उभारुन द्यावी या साठी आज यांनी जिल्हा कडे धाव घ्यावी लागत आहे.
अद्यापही ग्राम पंचायत जिल्हा परिषद शाळेत राहावे लागत आहे. यामुळे पूरग्रस्तांची दिवाळी जिल्हा परिषद शाळेतच झाली आहे.
गेल्या 4 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका व गावालगतची बोडी फुटल्यामुळे पळसगांव येथील कुटुंबाना बसला असून घरकुल व मदतीची आवश्यकता असताना लोकप्रतिनीधी व प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असून फक्त निवडणुकी पुरते कुटुंब आशावशीत केले होते की काय?असा प्रश्न या निमित्याने समोर येत आहे, अतिवृष्टी चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पळसगाव येथील घरे वाहून गेली, तर काहींची पडझड झाली, त्यामुळे या भागातील रहिवाशांचे शाळांत स्थलांतर करण्यात आले होते. पूरस्थिती ओसरल्यानंतर तरी घरकुल मिळतील या आशेने अजूनही कुटुंब आहेत,असून या कळे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे,घरे वाहून गेलेल्या कुटुंबाचे लवकरच पुनर्वसन करण्याचे प्रशासनाने जाहीर करणार केले होते.पण कुठेच पत्ता दिसत नाही,त्यामुळे घरे मिळण्याची आशा पूरग्रस्तांना होती; परंतु त्यानंतर याबाबत साधी चौकशीही झाली नसल्याने पुनर्वसन करणार, की शाळेतच मुक्काम ठेवणार, असा सवाल आता पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.
पुरात पडझड झालेल्या 40 घरांमध्ये रहिवासी असुरक्षितपणे राहात असून प्रशासनाचे त्यांच्या दुर्लक्ष होत आहे.
‘प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे देण्याची मागणी
गरीब कुटुंबांनी पूरग्रस्तांने जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर पूरग्रस्तांना लवकर घरकुल मिळावे या करिता सतिशभाऊ वारजूरकर यांनी सुद्धा आज जिल्हा परिषदला कळविले असून मी तुमच्या सोबत असून आज त्यांनी पुरगस्तना जिल्हा परिषद मध्ये दीर दिला आहे.
सदर घरकुलाची व आर्थिक मदत लवकर मिळावी या करिता निवेदन दिले असून निवेदन देताना मा,गीता मारोती शेंडे सरपंच पळसगांव, विश्वनाथ सोनूले,नामदेव गावतुरे,दिनेश गावतुरे,विकास खोब्रागडे, गुलाब सोनूले,अशोक सहारे,शत्रूद्न्य गूळधे ,शालू गुरनुले, भक्तदास कोहचाडे,विकास मोहूर्ली,गोकुल सोनूले,महानंदा गुळधे,सागर गूळधे,प्रफुल गावतुरे यांनी आज दिलेल्या निवेदनदावरे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!