सिरसपुर नदी पात्रा ची रात्रोला केली जाते रेतीची तस्करी

सिरसपुर नदी पात्रा ची रात्रोला केली जाते रेतीची तस्करी


आर.आय.व तलाटी यांची मिली भगत


जांभुळघाट  - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - चिमुर तालूक्यातील सिरसपुर नदी पात्रा मधून रात्रोला केली जाते रेतीची तस्करी रात्रोच्या वेळेस ट्रॅक्टर द्वारे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने लाखो रुपयांच्या महसुलास चुना बसत असून हे सर्व ट्रॅक्टर भिसी येथील असल्याची चर्चा आहे.
हि संपूर्ण ट्रॅक्टर भिसी मार्गे येत असून व त्याच मार्गाने वापस जात असून हे प्रकरण आर.आय. व तलाटी यांच्या संगम मताने सुरू असुन शुध्दा त्यांच्या विरोधात कोणती ही कारवाई तहसिलदार व उप विभागीय अधिकारी करताना दिसत नाही.या अधिकाऱ्या ची मिली-भगत असल्याचे सिरसपुर गावामध्ये सध्या चर्चा रंगली आहे. ट्रॅक्टर मुळे रस्त्याची फार मोठी नुसकान होत आहे.या रेती तस्करावर कारवाई करण्यात यावी,अशी गावकऱ्यांतर्फे मांगणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!