उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेऊन भारतीय संविधान दिले त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही - आम्ही ताठ मानेने जगत आहो. - केशवराव वरखेडे (बिरसा संदेश संपादक चिमूर)

उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेऊन भारतीय संविधान दिले त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही - आम्ही ताठ मानेने जगत आहो. 
- केशवराव वरखेडे (बिरसा संदेश संपादक चिमूर)


संविधान सन्मान दिन व क्रांतीज्योती महात्मा फुले पुण्यतिथी सयुक्त सोहळा मोठया उत्तहाने साजरा

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - पळसगाव ( पि )येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा व महामाया महिला मंडळ च्या  वतीने संविधान सन्मान दिन व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त आज दिनांक २६/११/२०१९ ला सायंकाळी ४ वाजता नालंदा बुद्ध विहिरीच्या पटगांवर महाविभूतींना महापुरुषना पुष्पहार अर्पण करून मा ,वरखेडे सर यांच्या हस्ते धम्म ध्वज ध्वजारोहण करून बुद्ध वंदना घेहुन कार्यक्रमला सुरवात करण्यात आली,भारतीय संविधानाची शपथ व प्रास्ताविक संदीप ढोक यांनी केली.
गीता शेंडे सरपंच पळसगांव यांनी मानवांनी पंचशील प्रमाणे वागने ही खरी गरज आहे,असे प्रतिपादन केले,आयु गणवीर साहेब वडाळा पैकु यांनी संविधानावरील पूर्ण प्रास्तविक कविता मधून संविधानाचे महत्व त्यांनी सादर केली, भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ७० वर्षे ११ महिने २९ दिवस होत असून.२६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या,१३० करोड जनतेला चालवायचे असेल तर भारतीय संविधान नुसार चालायवेच लागेल,मनुस्मृती वर सराणी जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की आज obc समाजाला बाबासाहेब कळले पाहिजे आणि घरो घरी त्यांचे विचार बसले पाहिजे असे प्रबोधन मा,प्रा,संजय पिठाडे सर यांनी केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.संविधानाची रक्षण करणे ही खरी काळाची गरज आहे.शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव . सर्व शाळा, व ग्राम पंचायत कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावे असे आवाहन अद्यक्ष मा,केशव वरखेडे सपादक बिरसा संदेश यांनी केले आहे. उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा न करीत सर्वना संविधान देहून सर्व भारतीयांना,  म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत,  या कार्यक्रमात मा,केशव वरखेडे ,प्रा,संजय पिठाडे चिमूर,गणवीर साहेब अद्यक्ष बौद्ध सभा वडाळा चिमूर,गीता शेंडे सरपंच,शेख गुरुजी प्रतिष्टीत कार्यकर्ता,सचिन बन्सोड अद्यक्ष तंटा मुक्त समिती ,संपत येसनसुरे,सुखचंद कुंभरे,प्रभाकर गंजभिये सचिव बौद्ध समाज पळसगांव,दामोदर रामटेके अद्यक्ष अखिल भारतीय बौद्ध समाज,पळसगांव ,वनिता भीमटे महामाया महिला मंडळ,सुनीता पाटील सचिव महिला मंडळ,
 सायंकाळी 7 वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम करण्यात आला,सदर कार्यक्रमाचे संचालन प्रदीप गजभिये,व आभार नागसेन पाटील यांनी केले या कार्यक्रमास उपासक उपसकांनी मोट्या संख्यनी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!