शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; शिवसेनेची मागणी.
मुल ( ग्रामीण) सोमेश्वर रेड्डीवार .
तालुक्यातील वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने धान पिकाचे तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने भरपाई मिळणेबाबत शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मूल तालुक्यातील धानपिक तसेच इतरही पीकाचे नुकसान झाले आहे. काल दि. 30/10/2019 ला रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मूल आणि परिसरातील शेकडो हेक्टरवरील धान पिकाचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. मूल तालुक्यातील चिचाळा,हळदी,भेजगाव,भंजाळी,मारोडा,भादुर्णी,उसराळा,चिखली,चिमढा,टेकाडी या परिसरातील शेतीतील उभे असलेले धान पिक वादळी वाऱ्यामूळे झोपल्या गेली त्या मूळे भरत आलेले धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मा.शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन निवेदन देण्यात आले आहे की, दि. 30/10/2019 चा वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने चौकशी पंचनामा करून शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच प्रमाणे यावर्षीचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून पिकविम्याच्या लाभ देण्यात यावा. करीता सदर निवेदन सादर करण्यात आले यावेळी मा. शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार राहुल मुरकुटे उपसरपंच ताडाळा नागोशे सर शेतकरी मुकेश गाडलेवर प्रकाश मेश्राम दादाजी लोडेलीवार व परिसरातील इतर शेतकरी, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!