सततच्या पावसाने धान पीक संकटात!
सततच्या पावसाने धान पीक संकटात!
नैसर्गिक आपत्ती पुढे शेतकरी हतबल.
मूल (प्रकाश चलाख)
मुल तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे धानावर बुरशीजन्य व इतर रोगाचा प्रकोप झाला असून निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी हतबल झाला असून तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. तालुक्यात उत्तम प्रती च्या धानाची लागवड केल्या जाते. धान पिकाचा पेरा तालुक्यात अधिक असून रब्बी हंगामात शेतकरी इतर पिके पर्याय म्हणून घेतात. परंतु खरीप हंगामातील धान पीक हे या परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीला विश्रांती घेतली. यामुळे बळीराजा चिंतेत असताना नंतर समाधान कारक पाऊस परिसरात झाले. शेतकरी वर्ग खरीप हंगामा च्या कामाला लागला. धान पिकाची उत्तम लागवड केली. धान पिकाला पुरेसा असा समाधानकारक पाऊस पावसाळ्यात बरसला. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला. पावसाची या हंगामात पिकाला चणचण कधीही भासली नाही. निसर्गाने ही साथ दिली.
परंतु गेल्या एक आठवड्यापासून होत असलेल्या अनियमित पावसामुळे धान पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रकोप झाला असून धानाच्या ओंबी भरण्याच्या अवस्थेत निसर्ग कोपला असून उत्पन्नात कमालीची घट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सतत अनिमित पाऊस ,ढगाळ वातावरण या कारणामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक धोक्यात असून या वर्षी उत्पादनात पाऊस पडूनही कमालीची घट येणार असे शेतकरी वर्गात बोलल्या जात आहे.
परिसरात मजवा, जड प्रतीच्या वाणाचे धानपीक शेतकरी घेत आहेत. मजव्या प्रतीच्या वाणाचे धानपीक कापणी योग्य झाले असून अनियमित होत असलेल्या पावसाने या पिकाची कापणी खोळंबली असून होत असलेल्या पावसामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जड प्रतीच्या धनाचे वाण फुलोऱ्यावर असून ढगाळ वातावरण व सतत अनिमित पावसाने या पिकावर रोगाचा असर पडला असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे.
"परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणाने धान पिकावर अस्मानी संकट असून हाती आलेल्या उत्पादनात कमालीची घट येणार असून शेतकरी वर्ग निसर्गापुढे हतबल झाला आहे."
विलास मडावी,शेतकरी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!