ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव


नागरिक त्रस्त व अधिकारी सुस्त


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
 

पळसगाव : -  ग्रामीण भागातील ताडोबाच्या जंगल व्याप्त असलेल्या आदिवासी बहुल गाव मौजा पळसगाव व परिसरातील जवळपास अकरा गावांची वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी ग्राम पंचायत पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नेरी येथील ऑक्सिजनवर असलेला वीज पुरवठा दहा-दहा मिनिटांनी खंडित होत असल्याने तसेच लहान पावसात नेहमी रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.सदर केंद्राची लाईन रिसॉर्ट दिली असून त्यांची लाईन बरोबर राहते फ़क्त ग्रामीण भागातील लाईन जाते अशी गावात चर्चा आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या नेरी उपकेंद्रावरून पळसगांव ते पिपरडा  अकरा गावांना वीज पुरवठा होतो; परंतु तांत्रिक बिघाडाने गावातील परिसरातील  गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. थोडा जरी वादळी वारा सुटला किंवा पाऊस आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. पळसगाव वासीयांना नेहमीच संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागत आहे. . नेरी येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून  पळसगांव  येते सर्कल ला एक कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्या वेळेस वीज पुरवठय़ात बिघाड होऊन खंडित झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते व दुसर्‍या दिवशी विद्युत कर्मचारी कर्तव्यावर आल्यावर तो बिघाड दुरुस्त झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होतो, तोपर्यंंत विजेशिवाय काम भागवावे लागते. जंगली श्वपादे मुळे,साप विंच,वाघ असल्या प्राणी रात्रोला गावात शिरकाव करीत असतात याचा प्रतक्ष अनुभव गावकरी याना आहे,सदर गावातील ग्रामस्थांना डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे थेंब पडले की लाइन बंद, असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सदर लाइन केव्हा सुरळीत होणार, या बाबत ग्रामस्तानी मोबाईल द्वारे विचारणा केले तर कर्मचारी यांचा मोबाईल बंद अवस्थेत असतो,या गँभीर बाबीचा नोंद संबंधित अभियंता यांनी लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
मुख्यालयी अधिकारी आणि कर्मचारी राहत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!