विकासाला मुदतवाढ देण्यासाठी परत एकदा संधी द्याल,मा बंटीभाऊ भांगडीया

विकासाला मुदतवाढ देण्यासाठी  परत एकदा संधी द्याल,मा बंटीभाऊ भांगडीया


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : -  चिमूर विधानसभा क्षेत्रात उभे असलेले  भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार, बंटीभाऊ भांगडिया यांच्या प्रचारार्थ मासळ -मदनापूर या जिल्हा परिषद गटातील विहिरगाव पळसगांव,पिपरडा,वडसी या प्रत्येक गावांत मतदारांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे.
आज मौजा पळसगांव येथील कार्यकर्तेनि बंटीभाऊच्या स्वागत फटाक्यांचा आतिषबाजी ,व कमळाच्या फुलांनी व गावातील रस्तावर रांगोळी काडून स्वागत करण्यात आले.
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गोदेडा या तपोभूमीचा विकास केल्याने गुरुदेव भक्तासाठी भक्तनिवास ,सभागृह निर्माण करण्याचे काम आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनीच केले आहे, खोटे बोलून राजकारण करणाऱ्या त्या उमेदवारापासून  सावध राहावे सच्चा गुरुदेव सेवक असलेला उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांना विजयी करून परत एकदा चिमूर विधानसभा क्षेत्रातील  विकासाला मुदतवाढ द्याल असे आव्हान राजू देवतळे यांनी केले, सर्व चिमूर मतदार संघतील गावे पिंजून काढीत आहे,
पळसगांव येथील भाजप शिवसेना आर पीआय आ रासप महायुतीचे उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कॉर्नर प्रचार सभेत च्या वेळी  आहे,या वेळी
वसंत वारजूकर  रामदासजी जांभुळे राजू देवतळे ओमप्रकाश गणोरकर प्रवीण गणोरकर डॉ देवनाथ गन्धरे  अब्दुल पाटील असिफ शेख गजानन गुळध्ये  संजय राचलवार टीमु बलदवा,वर्षा लोणारकर,विनायक ठाकरे,ज्ञानेश्वर गुरनुले,जाणिक बन्सोड,प्रज्वल लोणारकर,गणपत आत्राम आदी उपस्थित होते. भांगडीया यांनी विरोधी उमेदवार आणि त्यांचे काही कार्यकर्त्यांनी माझ्या वर खोटा आरोप  करीत असून माझ्या क्षेत्रातील विकास त्यांना पचत नाही, माझ्यावर करीत असलेल्या आरोपाचे खंडन करीत विरोधी पक्षाच्या उमेदवार हे राष्ट्रसंताना भारतरत्न देण्याची मागणी करता तेव्हा यापूर्वी सत्ता असताना त्यांनी का केले नाही, माना समाजाची जात पडताळणी चे काम आमच्या सरकारनेच केले असून सिंचन ची व्यवस्था केली आम्ही केली आहे, असे मत बंटीभाऊ भांगडीया यांनी वेक्त केले,विरोधकांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तेव्हा मुदतवाढि साठी मतदाराकडे आले असून विकासाचा व सामाजिक उपक्रमतेचा लेखाजोखा सांगत सेवा करण्यासाठी संधी देण्याचे काम उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले .
संचालन मनिष तुम्प्लिवार यांनी केले असून मोठया संख्येने मतदार उपस्थित होते .
यावेळी भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते बंटीभाऊ भांगडीया  यांना विजयासाठी सक्रिय झाले असून परिश्रम घेत आहे.या युतीच्या बालेकिल्यातून  हजाराचे मताधिक्य देणार असल्याचे भाजपाचे कार्यकरता हाफिज शेख यांनी प्रचारा दरम्यान सांगितले. तर महायुतीचे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एकरूप राहून कामे करावी.मासळ - मदनापूर जि. प. गटातील प्रचाराच्या वेळी रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित होते. सोबत भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!