राजकीय लढतीत जनता मत मारणार समाजावर
राजकीय लढतीत जनता मत मारणार समाजावर
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराना धक्का
चिमूर ७४ विधानसभा....२०१९
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभूळघाट :- ई.व्हि.एम.ची बटन दबायला अवघे दोन दिवस उरले आहेत.सव॔ उमेदवारांची स्थिती आटोक्यात राहील ही अपेक्षा मात्र चिमुर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील राजकिय हवापालट झाल्याने मावळल्याची चर्चा आहे.आता जातिय समिकरणावर निवडणुक घमासान स्थिरावले असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याची चर्चा असून समीकरण समाजावर गेले तर,राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना धक्का बसनार हे निश्चित.
चिमुर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात १९८५ मधिल विधानसभा निवडणूकीचा अपवाद वगळता आलटून पालटून कांग्रेस,भा.ज.पा
चे आमदार निवडून आले आहेत.१९८५ मध्ये जातियवादी समिकरण पाॅवरफुल ठरले व सव॔ राष्ट्रीय पक्षांना डावलून डॉ.गजबे विधानसभेत पोहोचले. या विधानसभा निवडणुकीत नेमके असेच काहीसे समाजाचे समिकरण पुढ्यात आल्याची चर्चा सजल्याने राष्ट्रीय पक्षांची झोप उडाली असून समिकरण गडबडणार हे क्षेत्रात सुरु चर्चा तून स्पष्ट होत आहे. आता चेंडू अपक्ष उमेदवार बंडखोर भाजपा पदाधिकारी धनराज मुंगले आणि वंचित बहूजन आघाडी चे उमेदवार अरविंद सांदेकर यांच्या बाड॔र मध्ये असून या दोघांत व सरळ लढतिचे चित्र असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या विधानसभा क्षेत्रात विजयाची चाबी सांभाळणारा माना समाजाने आपले समिकरण सजवल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे बहुसंख्य तेली समाज मतदारांनी आपली स्वतंत्र चुल तयार झाली असल्याचे स्पष्ट चित्र आहे. असे झाल्यास भाजपा चे उमेदवार कीर्तीकुमार भांगडीया व काँग्रेस चे उमेदवार डाँ.सतीश वारजुकर या दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना जोरदार धक्का बसणार व१९८५ ची पुनरावृत्ती होणार असे जाणकारांचे मत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!