अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी राजे अम्ब्रीशरावआत्राम यांना निवडून दया.
अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी राजे अम्ब्रीशरावआत्राम यांना निवडून दया.
गृहमंत्री अमित शहा
अहेरी (सेवा पवार)
काँग्रेस च्या 65 वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्हातील गरीब,आदीवासी जनतेला सरकारी योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवण्यात आले होते.मोदी,फडवणीस सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक लोकपयोगी योजना आणून मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. मोदी जींच्या नेतृत्वात जगात देशाची मान उंचावली आहे.असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा भा ज पाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज आलापल्ली येथे क्रीडा संकुल मैदानावर आयोजित अहेरी विधानसभे करीत भाजपा महायुती चे उमेदवार अंबरीश राव आत्राम यांच्या प्रचारसभेत केले.
यावेळी मंचावर भाजप महायुती चे अहेरी विधानसभा क्षेत्रासाठीचे उमेदवार अंबरीश राव आत्राम,गडचिरोली चे उमेदवार डॉ.देवराव होळी,आरमोरी चे उमेदवार कृष्णा गजबे, खा.अशोक नेते,जीप अध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे,अहेरी च्या नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे,बाबूंराव कोहळे,प्रकाश गेडाम,विनोद आकंपल्लीवर,सतीश गोटमवार सेना नेते राजगोपाल सुलावार आदींची उपस्थिती होती.
खचाखच भरलेल्या क्रीडा संकुलाच्या मैदानात जनसमुदायाला संबोधित करताना गृहमंत्री शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आदिवासी देवतांना नमन व शहिद वीर बाबूराव सेडमाके,बिरसा मुंडा यांना अभिवादन करुन केली.
गडचिरोली जिल्ह्या हा अविकसित ,दुर्गम आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याने ही बेरोजगारी दूर करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची घोषणा केली.त्या सोबतच या ठिकाणी जिल्हातील 85% स्थानिक युवकांना या प्रकल्पात रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं.
मुलचेरा तालुक्यातील चेण्णा सिंचन प्रकल्प याचे काम अंतीम टप्यात असून त्याला पूर्णत्वास नेण्याचे काम करू.
जिल्हात वनसंपदा भरपूर प्रमाणात आहे त्यावर आधारित उदयोग उभारून औद्योगिक वसाहत उभारण्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
एटापल्ली -आष्टी-बल्लारपूर रेल्वेमार्ग चे सर्वेक्षण करून हा रेल्वेमार्ग उभारणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नक्सली लोक नेहमीच येथील विकासकामांत खोडा टाकत असतात मोदी सरकारने पाच वर्षात नक्सल्यावर लगाम घातला आहे. येत्या पाच वर्षात नक्सलवाद मुळापासून उखडून टाकू .जिल्हाच्या विकासासाठी 531 कोटींचा निधी दिला.ओ. बी.सी व आदिवासींच्या विकासाकडे काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केले होते भाजपा सरकारने त्यांना साथ देऊन विकासासाठी कार्य केले आहे. आदिवासी स्वातंत्र्य सेनानी वीर बाबूराव सेडमाके यांचे शहीद स्मारक उभारून त्यांना सन्मान देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा देशाच्या 115 अतिविकसीत जिल्हात समावेश होतो. जिल्हाला सुचिबद्ध करून विकासासाठी निधी दिला. बांबू कटाई चा परवाना देऊन त्यावर आधारित उद्योग उभारून येथील लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर उपचार केंद्र स्थापन करून कॅन्सर रुग्णना सुविधा उपलब्ध करून देणार.
काँग्रेस चे युवराज राहुल गांधी यांनी सांगावे ,65 वर्ष तुमच्या काँग्रेस ने देशावर राज्य केले येथील आदिवासी लोकांसाठी काय केले.मोदी सरकारच्या कार्यकाळात आदिवासी जनतेला सन्मान दिला.1 लाख 30 हजार शौचालय बनविले,उज्जवला योजनेच्या माध्यमातून48 हजार गॅस सिलेंडर देऊन माता भगिनींना धुरापासून मुक्ती दिली.1 लाख 8 हजार शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले.48हजार घरात वीज पोहोचविली .8 हजार आदिवासींना घर देऊन त्यांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षत उतरविले.
राहुल गांधी आणि शरद पवार यांनी 65 वर्षाचा लेखाजोगा घेऊन यावा त्यांनी सांगावे गडचिरोली,अहेरीच्या विकासासाठी काय केले??
शरद पवारांना त्यांनी आव्हान दिले की,तुम्ही गडचिरोली मध्ये या तुमच्या कार्यकाळात किती कामे झाली व आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही किती विकासकामे केली.
काँग्रेस च्या कार्यकाळात 1 लाख 15 हजार कोटी चा निधी देण्यात आला होता.आमच्या भाजप सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात 4 लाख 38 हजार 760 रुपयांचा निधी देऊन अनेक विकासकामे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित केला.काँग्रेस ने वोटबँकेसाठी साठी 370 कलम हटविले नव्हते. नुसते यावर राजकारण केले.जम्मू काश्मीर मध्ये 40 हजार लोकांचा त्यांच्या वोट बँके लालसेपोटी हकनाक बळी गेला.आमच्या सरकारने 370 कलम हटवून काश्मीर ला वीकासाच्या प्रवाहात आणले आहे.
शरद पवार विचारतात महाराष्ट्र च्या निवडणूकित काश्मीर चे काय लेणं देणं??तर मी सांगतो काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे.काश्मीर व देशाच्या सूरक्षततेसाठी 370 कलम हटविणे गरजेचे होते.काँग्रेस ने स्पष्ट करावे की ते देशा सोबत आहेत की देश विरोधी लोकांसोबत आहेत??
देशाला जगात सन्मान मिळवून देण्याचे काम मोदी जीनी केले आहे.त्यांनी देशाची मान ताठ ठेवन्याचे काम विदेशात केले आहे.
मोदी च्या लोकप्रियते मुळे विरोधी लोकांच्या पोटात पोटशूळ उठतो आहे. गडचिरोली-महाराष्ट्र-देशाची प्रशंसा आज विदेशात होते आहे ते मोदि च्या कणखर नेत्तुत्वामुळेच.अमेरिकेचे राष्ट्पती ट्रम्प यांनी मोदी हे विश्वात लोकप्रिय नेते आहेत म्हणून प्रशंसा केली आहे.
त्यामुळे येत्या 21 तारखेला भाजपा उमेदवाराना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
यावेळी काँग्रेस नेत्या सगुणा तलांडी यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.त्यांना दुपट्टा देऊन शहा यांनी पक्षप्रवेश दिला..
याआधी खा.अशोक नेते,अहेरी चे उमेदवार अंबरीश राव यांचे ही उद्बोधन जनतेला झाले.
कार्यक्रमाचे संचालन रवी ओलालवार यांनी तर आभार सतीश गोटमवार यांनी केले.
सभेला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जनतेची व भाजपा कार्यकर्त्याची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!