चिमूर क्षेत्रात वाढलीय प्रस्तावित उमेदवारांची डोकेदुखी व सांधेदुखी

चिमूर क्षेत्रात वाढलीय प्रस्तावित उमेदवारांची डोकेदुखी व सांधेदुखी


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रारंभ झाला आणि चिमूर क्षेत्रात बंडखोर व बहुजन वंचित आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी व सांदेदुकीचा त्रास स्पष्ठपणे झाल्याची जाणीव मतदारांना होत आहे.
          चिमूर विधानसभा क्षेत्रात दहा उमेदवार हे आमदार होण्याचे स्वप्न रंगवीत असले तरी जनतेच्या नजरेत आणि दृष्टिकोनात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ सतीश वारजूकर, बहुजन वंचित आघाडीचे अरविंद सांदेकर व भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देऊन बहुजन समाजाचा खंबीर चेहरा म्हणून मैदानात असलेले धनराज मुंगले यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र दिसत आहे.
          चिमूर विधानसभा क्षेत्र हे यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जायचे, मात्र यापूर्वी अपक्ष उमेदवार डॉ रमेशकुमार गजभे, तत्कालीन शिवसैनिक विजय वडेट्टीवार, विद्यमान आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात ते यशस्वी ठरले असले तरी या क्षेत्राचे मूळ काँग्रेस सोबत जुळलेले आहे, मात्र यावेळी चित्र भयानक दिसत आहे, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकरीता चिमूर तालुका भाजपा अध्यक्ष तथा आपल्या तथा आपल्या कार्यकौशल्याने बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत असलेले धनराज मुंगले यांनी प्रस्थापित काँग्रेस व भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे तर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांच्या प्रचारामुळे अनेकांना मतदार क्षेत्रात फेऱ्या मारून आपली सांधेदुखी करण्याची पाळी आली आहे.
          "कपाट करील सपाट" हा ध्यास घेऊन उभे असलेले उमेदवार धनराज मुंगले हे जरी स्वप्नवत असले तरी ते दिवास्वप्न ठरू नये यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी अशी जनतेत चर्चा आहे.
          बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर हे स्पष्ट बोलतांना दिसत नाहीत, यातून त्यांच्या कार्यपद्धतीवर काही जनता उलटसुलट चर्चा करीत आहेत, माना समाजाचे खंबीर नेतृत्व असलेले अरविंद सांदेकर हे खऱ्या अर्थाने प्रस्थापित राजकीय पक्षाची डोकेदुखी ठरायला पाहिजे होते, मात्र ते फक्त सांधेदुखी ठरले आहेत, यात बहुजन समाजाचे खांभिर नेतृत्व म्हणून उदयास आलेले नेतृत्व धनराज मुंगले हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
          एकूणच चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवार किर्तीकुमार भांगडिया व काँग्रेसचे उमेदवार डॉ सतीश वारजूकर यांच्यात सरळ मैदानी कुस्ती होत असताना अरविंद सांदेकर व अपक्ष धनराज मुंगले यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
          या सर्व राजकीय लढाईमध्ये बहुजन समाजपार्टी, मानवतावादी पक्ष,शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्षांची भूमिका काय असेल यावर चिमूर विधानसभा मतदारसंघाची दिशा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!