मुंगलेची डोकेदुखी तर सांधेकरांनी वाढविली सांधेदुखी ?

मुंगलेची डोकेदुखी तर  सांधेकरांनी वाढविली सांधेदुखी ?


चिमूर विधानसभा क्षेत्रात बहुरंगी रंगतदार लढत


चिमूर विधानसभा...२०१९
*********************

जांभुळघाट - प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )


जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात सर्व पक्षीय प्रचार बहरला आहे.मात्र जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रात भा.ज.पा.बंडखोर उमेदवार धनराज मुंगले यांनी वाढविलेली इतर उमेदवारांची डोकेदुखी व  वंचित आघाडी चे 
उमेदवार अरविंद सांधेकर यांनी 
वाढविलेली प़तिस्पध॔कांची भटकंती व त्यातून वाढलेली सांधेदुखी सध्या क्षेत्रात चचैचा विषय आहे.गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी उमेदवार डॉ.गजबे यांनी या विधानसभा मतदारसंघात ५२ हजारांवर मते मिळविली होती व आताही सांधेकरांच्या प़चाराचे नेतुत्व डॉ.गजभे सांभाळून आहेत.
     
        भा.ज.पा. बंडखोरीचा फटका व बंडखोरीचा बडगा उभारून पुणं ताकदीने मैदानात
उतरून धनराज मुंगले यांनी भा.ज.पा.उमेदवार बंटी भाऊ भांगडिया यांना बाधलेला "सुतळीबॅाम्ब" ,व भा.ज.पा.गोटात वाढलेली डोकेदुखी बघता या क्षेत्रातिल लढत बहुरंगी ठरणार एवढे मात्र निश्चित समजले जात आहे.

      भा.ज.पा.बंडखोरीची चूल धनराज मुंगले यांनी पेटविली मात्र या धुराडयाने कांग्रेस व भा.ज.पा.चमू गुदमरली तर नाही ना?असेही चित्र चचैत येऊ लागले
आहे.या क्षेत्रात भारतीय.ज.पा.चा 
भांगडिया विरोधी गट पळदयामागून मुंगले चे कपडे सांभाळून असल्याचे बोलल्या जात आहे.दुसरीकडे मुंगले ज्या
तेली समाजातून आहेत ते समाज बांधव मुंडले हेच चांगले या नेटानं आपली मानसिकता ठरवून बसल्याचे चित्र कांग्रेस उमेद्वार शतिशभाऊ वारजूकर विवंचनेत 
पडल्यास नवल ते काय? या क्षेत्रातील तेली समाज नेहमी कांग्रेस सोबत राहिल्याचा इतिहास आहे.मुंगले यांनी समिकरण बदविलेले दिसूनं येत आहे.या मतदारसंघात अडिच लाखांवर मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.या मतदार संघात माना समाजाची "व्होटबॅंक" मोठी आहे.डाॅ.गजभे यांनी वंचीत बहुजन आघाडीचे प़चाराची धुरा
सांभाळल्याने या समाजाचा मोठा
मतदार भा.ज.पा. व कांग्रेस उमेदवारांना किती फटाके बांधणार हे अजूनतरी स्पष्ट न झाल्याने बहुरंगी लढतिचे चित्र दिसून येत आहे.

            दलित बांधवांच्या मतांवर कांग्रेस ची नजर जरी असली तरी वंचित आघाडी उमेदवार सांधेकर किती लाटतात या विवंचनेत असलेल्या कांग्रेस कंपू ला धावपळीने सांधेदुखी चा
सामना करावा लागणार आहे.
तर तिकडे धनराज मुंडले च्या बंडखोरीन भांगडिया गटाची डोकेदुखी वाढली हे निश्चित.

अशा स्थितीत उर्वरित पाच दिवसांत निवडणुक डोकेदुखी व सांधेदुखी वर काय उपाययोजना करता येईल हे नवे टेंशन  भा.ज.पा.व कांग्रेस उमेदवारांना 
आहेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!