चिमूर विधानसभा निवडणूकिमध्ये होणार तिरंगी लढत

चिमूर विधानसभा निवडणूकिमध्ये होणार तिरंगी लढत
 

किर्तीकुमार भांगडीया व डॉ.सतीश वारजुकर यांना फुटनार घाम


जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )


चिमुर : -  चिमूर विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य तिन उमेदवारामध्ये तिरंगी लढत होणार असून भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडीया व काँग्रेस पक्षाचे डॉ.सतीश वाजुरकर व अपक्ष उमेदवार माजी बिजेपी तालूका अध्यक्ष धनराज मुंगले यांच्यामध्ये होणार तिरंगी लढत.

बिजेपी.चे उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांना फुटनार घाम.जी २०१४  ला मोदी लाट होती ती आता राहिलेली नाही.वेगळ्या विदर्भाचा मुद्दा किंवा चिमुर जिल्हा करणार पण हे दोन ही वचन पाच वर्षात पुर्ण केले नाही.ज्यासाठी जनतेने पाठिंबा दिला ते बिजेपी ने पुर्ण केले नाही.जनता नाराज असल्याने जे सहकार्य मीळणार होते आता तो मिळणार नाही.माजी बिजेपी तालुका अध्यक्षाची बंड खोरी,कार्यकर्ते यांमुळे जनतेची व माजी कार्यकर्ते यांना मान सम्मान  मिळत नसल्या ने नाराजगी व्यक्त ,मित्र पक्ष शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शिवसेना सुद्धा बंड खोरी करणार, या मुळे किर्तीकुमार भांगडीयाला घाम फुटणार आहे. 

काँग्रेस चे उमेदवार डॉ.सतीश वारजुकर यांच्या काँग्रेस पक्षामध्ये सुध्दा बंड खोरी करीत असल्याने व सत्तेमध्ये नसल्याने निवडून आले तरी विकास होणार नाही.अशी जनतेमध्ये चर्चा असल्याने डॉ.सतीश वारजुकर यांना सुध्दा घाम फुटणार आहे अशी जनतेत चर्चा रंगली आहे. पण याची जी मागील २ वर्षा पासुन जी संघटना बांधणी चा काम केली ती आता मजबुती ची बाजु समजली जात आहे. काँग्रस पक्षाचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी आपली प्रचारासाठी पुर्ण ताकत पणाला लावली असुन,प्रत्येक गावा - गावा,घरा - घरात प्रचार करीत आहे. 

अपक्ष उमेदवार माजी बिजेपी तालूका अध्यक्ष धनराज मुंगले हे आजच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांत समोर आहे. तेली समाजाची संघटना आणि जे मागील २० वर्षा पासुन बिजेपी संगटना तयार केली ती संघटना त्यांच्या समर्थनात आहे. अशिही चर्चा जनेतेमध्ये रंगली आहे. माजी बिजेपी च्या कार्यकर्त्यांना मान न मिळाल्याने  माजी तालुका अध्यक्ष धनराज मुंगले यांना याचा लाभ मिळणार आहे. 
चिमुर विधानसभा निवडणुकीमध्ये तीरंगी लढत होणार अशी यावरून जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.

1 टिप्पणी:

  1. तिरंगी नाही चौरंगी लढत होणार...कारण वंचित आघाडी पण मैदानात आहे..वंचित बहुजन आघाडीने चिमूर विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या निवडणुकीत 50000 च्या वर मत घेतले होते..म्हणून आपण प्रतिनिधी आहात जनतेपर्यंत योग्य माहिती पोहचेल याची दक्षता घ्या

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!