भिसी नगरीमध्ये महर्षी वाल्मिकी ऋषि यांची जयंती मोठ्या उत्साहाने दुमदुमली

भिसी नगरीमध्ये महर्षी वाल्मिकी ऋषि यांची जयंती मोठ्या उत्साहाने दुमदुमली


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - रविवार दिनांक. १३ ऑक्टोबर ला महर्षी वाल्मिकी उत्सव समिती तर्फे  आद्यकवी महान ऋषी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती भव्य शोभायात्रा रॅली काढून साजरी काढण्यात आली.
जोड मारुती देवस्थान गाव तलाव भिसी येथून ढोल ताशांच्या गजरात ढिवर भोई बांधवांनी उत्स्फूर्तपणे आनंदी वातावरणात हजारो च्या संख्येने संघटीत होऊन उपस्थिती दर्शविली. या रॅली ला वासुदेव बाबूजी दिघोरे, हरिदास मोहिणकर सामाजिक कार्यकर्ते, गजेंद्र चाचरकर संयोजक ग्रामविश्व संघर्ष वाहिनी, शामरावजी नागपुरे सामाजिक कार्यकर्ते, रामचंद्र दिघोरे सामाजिक कार्यकर्ते यांनी जोडमारुती देवस्थान आणि महर्षी वाल्मिकी च्या प्रतिमेची पूजा करून सुरवात केली. 
प्रमुख पाहुणे बालाजी मोहिणकर चिमूर, माजी सरपंच रमेश जी नान्हे डोंगरला, प्रकाश नान्हे सर नेरी अध्यक्ष एकलव्य सेना आणि इतरही मान्यवर उपस्थित होते। चंद्रपूर मच्छीमार संघ संचालिका सौ.दुर्गा वसंत शिवरकर, ग्राम पंचायत सदस्य नागपुरे बाई आणि इतरही मान्यवर महिला उपस्थित होत्या. सर्व रॅली मधील ढिवर भोई बांधवांनी जय वाल्मिकी लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. जय भोईराज, जय वाल्मिकी, जय एकलव्य चे नारे भिसी च्या मुख्य रस्त्यावर दुमदुमत होते. सर्वश्री सामाजिक कार्यकर्ते राजू मधुकर कुमले, मनोज काकाजी दिघोरे, शिवाजी दिघोरे, कारू नागपुरे, कैलास शामराव नागपुरे, दिनेश दिघोरे यांनी भिसी बाजार चौकात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला माल्यार्पण केले.या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी सर्वश्री आनंद हरी भानारकर, रोशन मोहिणकर, लखन दिघोरे, शामराव भानारकर, काकाजी दिघोरे, नेहरू खेडकर, खटू दिघोरे, अक्षय नागपुरे, राहुल दिघोरे, संतोष नागपुरे, केशव शिवरकर, सखाराम दिघोरे, हरिश्चंद्र नागपुरे, राकेश मोहिणकर, गजू नान्हे, लक्ष्मण भानारकर, लक्ष्मण चाचरकर, नानाजी बुधाराम मोहिणकर, दिवाकर हरिश्चंद्र दिघोरे आदींनी सहकार्य केले.

    महर्षी वाल्मिकी हे पूर्वाश्रमी सक्षम कठोर कणखर ताकदवर राजे होते, विरोधकांचे कर्दनकाळ होते. त्यांनी जंगलातील छोट्या छोट्या टोळी राजे लोकांना, सरदार सैन्याना संघटीत करून सक्षम राज्याची स्थापना केली होती. शत्रूच्या एका मृत्यू च्या बदल्यात एक इवलासा दगड! अशा इवल्या इवल्या दगडांनी त्यांनी सात रांजण भरले होते। महर्षी वाल्मिकी त्यांच्या पूर्वाश्रमी वाल्या कोळी नावाचे वाटमारी करणारे खुनी डाकू होते अशी आख्यायिका सांगितली जाते हे पूर्ण सत्य नाही। भोई ढिवर समाजाने आणि इतर जनतेने सुध्दा हा खरा इतिहास लक्षात घ्यावा. प्रचंड प्राणहानी म्हणजे पातक! ही चूक नारदांनी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी घोर दीर्घ तपश्चर्या केली.तपश्चर्येअंती भविष्यदर्शी बनून त्यांनी रामजन्म होण्या आधीच प्रसिध्द रामायणाची काव्यरचना केली. तुमचे रक्त हे राजाचे आहे, सतरंज्या उचलणाऱ्या चे वा मागे मागे फिरणाऱ्याचे नाही! सर्व भोई समाजाने, आई भगिनींनी, महिलांनी महर्षी वाल्मिकी चा आदर्श घ्यावा, आपल्या मुलांना सक्षम ताकदवर आणि शिक्षित घडवावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष, ग्रामविश्व संघर्ष वाहिनी चे संयोजक गजेंद्र दि चाचरकर यांनी केले. 

     या लोकशाही सरकारांच्या काळात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज घेण्यात आले आहे. काँग्रेस च्या काळात प्रत्येकावर अंदाजे पंचाहत्तर  हजार रुपये कर्ज होते. भाजपा च्या काळात अंदाजे प्रत्येकी सव्वा लाख इतके कर्ज झाले आहे.

अशा या कचखाऊ प्रस्थापित पक्षांच्या सरकारांमुळे आज मी कोणाच्या दोन पैशाचा डागीलदार नाही असे अभिमानाने तुम्ही म्हणूच शकत नाही ?

कोणतेही शासकीय काम असो पूर्ण रकमेपैकी चाळीस ते पन्नास टक्के रक्कम चपराशी, कर्मचारी, ऑफिसर, आमदार खासदार मंत्री वाटून खातात असा जनतेचा आरोप आहे.अशी शासकीय व्यवस्था असेल तर ही प्रस्थापित पक्षांची सरकारे कर्ज फेडणे शक्य नाही. उद्या परत भारतावर पारतंत्र्य येऊ शकते.चिमुर च्या बाल्या ढिवर आणि इतर शाहीदांनी यासाठी बलिदान दिले होते का ? आज सुद्धा आपल्याला महर्षी वाल्मिकी सारखा कणखर, ताकदवर सक्षम नेतृत्वाची गरज आहे.

प्रस्थापित पक्षांना धडा शिकविणे अतिअवश्यक आहे, या निवडणुकीत त्यांना अद्दल घडवा

असे आवाहन गजेंद्र चाचरकर यांनी रॅली नंतर झालेल्या सभेत केले। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एकलव्य सेनेचे विधानसभेचे उमेदवार श्री प्रकाश नान्हे यांनी सर्व भोई ढिवर बांधवांनी संघटित राहण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!