दिवाळीपूर्वी शिक्षकांचे पगार होणार शासन निर्णय जारी शिक्षक भारतीची मागणी मान्य
दिवाळीपूर्वी शिक्षकांचे पगार होणार
शासन निर्णय जारी
शिक्षक भारतीची मागणी मान्य
पळसगाव - प्रतिनिधी (विकास खोब्रागडे)
पळसगाव : - दिनांक ९ ऑक्टोबर २०१९
दिवाळीपूर्वी शिक्षकांचे पगार होण्याबाबत शिक्षण खात्याने आज शासन निर्णय जारी केला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारतीने याबाबत शिक्षण खात्याकडे पाठपुरावा केला होता.
दिवाळी सण खरेदी आणि दिवे लागण, धनत्रयोदशीला म्हणजे २५ ऑक्टोबरला सुरु होते. दि. २६ व २७ ऑक्टोबर रोजी शनिवार रविवार आहे. दिवाळी हा महाराष्ट्रासाठी मोठा सण आहे. त्यामुळे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचा दिवाळीचा पगार दिवाळीपूर्वी होण्याबाबत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पत्रव्यवहारही केला होता.
दिवाळीपूर्वी पगार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,कार्याध्यक्ष जब्बार शेख,सचिव नंदकिशोर शेरकी,रावन शेरकुरे,विलास फलके,डाकेश्वर कामडी,विजय मिटपल्लीवार यांनी कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!