जागतिक बालिका दिन साजरा.

मुल (आकाश गेडाम) 

मॅजिक बस संस्थेच्या वतीने जागतिक बालिका दिन साजरा करण्यात आला.

दिनांक - ११ ऑक्टोम्बर हा दिवस जगभर जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर संस्थेच्या SCALE कार्यक्रमा अंतर्गत मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात  मूल तालुक्यातील 12 शाळेनं मध्ये जागतिक बालिका दिन साजरा करण्यात आला. 

या मध्ये मुख्यतः शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लघु चित्रपट दाखवून  बालकांचे होणारे लैंगिक शोषण, शारीरिक शोषण , भावनिक शोषण, दुर्लक्षित आणि गैरफायदा  इत्यादी शोषणा विषयी माहिती देण्यात आली. त्यासोबतच UNCRC या जागतिक संघटनेच्या द्वारे बालकांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारान विषयी जागृत करून बालकांवर होणाऱ्या शोषणाला आळा घालण्यासाठी Child Line ची कशा प्रकारे मदत घ्यायची या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

      सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा कोसंबी, चिचाळा, बोरचांदली, हळदि, भेजगाव ,खालवासपेठ, नलेश्वर, चिरोली मोरवाही, मरेगाव, चितेगाव, चिमढा व शरदचंद्र पवार विद्यालय भेजगाव इत्यादी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

        तसेच मॅजिक बस संस्थेचे तालुका कार्यक्रम अधिकारी निकिता ठेंगणे व शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके, निखिलेश चौधरी, शुभांगी रामगोनवार व आकाश गेडाम यांच्या परिश्रमाने सर्व शाळेतील  कार्यक्रम यशस्विरीत्या पार पडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!