विधानसभा निवडणूक चिमूर ७४ मध्ये भाजपा उमेदवारांचे बावन्न.....बावन्न
विधानसभा निवडणूक चिमूर ७४ मध्ये भाजपा उमेदवारांचे बावन्न.....बावन्न
जांभुळघाट - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
जांभुळघाट : - विधानसभा निवडणूक ७४ चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारांनी टोळी टाईट केल्याने भाजपा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांना जोरदार फटका बसण्याचे स्पष्ट चित्र असून शेवटच्या तिन दिवसांआधीच उमेदवारांवर बावन्न .... बावन्न करण्याची वेळ आल्याने भांगडीया कंपू हादरली असल्याची खमंग चर्चा आहे.मागील ८ ते १० दिवसात चिमुर विधानसभा क्षेत्रामध्ये एक प्रकारे निवडणूक वार सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जे घडत आहे, ते जर बघितले तर मतदारांच्या भावना बदलत असल्या चे संकेत मिळतात.घडणाऱ्या घटनांवर या क्षेत्रातिल मतदारांचे गंभीर चिंतन बघता यांचा मोठा फटका भा.ज.पा.उमेदवार भांगडीया यांना बसणार असे जाणकार बोलतांना दिसत आहेत. सामान्य जनतेने जर भा.ज.पा.उमेदवार प्रचार सभांमध्ये काही प्रश्न विचारले असता,त्यांना मारहाण करने,पोलीसाच्या स्वाधीन करणे किंवा धमकावने,अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने ग्रामिण भागातील संवेदनशिल जनता पार हादरली असून या उमेदवारांविरूद्ध प्रचाराचे प्रचंड भार पसरले आहे. हे स्पष्टपणे जाणवते.विधानसभा क्षेत्रात भिती चे वातावरण पाहायला मिळत असून ही लोकशाही आहे कि गुंड शाही अशी चर्चा जनते मध्ये जोरात सुरू असल्याने यांचा फटका उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांना बसणार अशी सामान्य जनते मध्ये चर्चा रंगत आहे.याचा मोठा फायदा विरोधी उमेदवाराना होणार यात कुठलीही शंका उरत नाही. निवडणुकीला उणे पुरे ३ दिवस उरले आहेत.आधिच बंडखोरीचा मोठा फटका भा.ज.पा.उमेदवारास बसला अाहे. अशा स्थितीत अमित शहा यांच्या प्रचार दौऱ्यानंतर सुद्धा उमेदवारांसाठी नव संजीवनी मिळाली नसल्याने गुंडशाही मुळे मतदार प्रचंड त्रस्त आहेत हे स्पष्ट होत आहे व यातून किर्तीकुमार भांगडीया यांना फटका बसणार हे निच्छित असल्याची माहिती प्रसारकांच्या मते दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!