एखादा जीव घेऊनच तयार होणार चारगाव नदीवर पूल.
एखादा जीव घेऊनच तयार होणार चारगाव नदीवर पूल.
सावली (वार्ताहर)
चारगाव नदीवर असलेल्या पुलावर चक मानकापूर येथील दोन सख्खे भाऊ पुराच्या पाण्यात पडले. सुदैवाने दोघांचा वाचला जीव परंतु दुचाकी गेली वाहून.
सावली पासून जवळच असलेल्या चारगाव नदीच्या पुलावर मागील काही दिवसापासून सतत पूर आहे. याच मार्गावर येत असलेल्या चारगाव, भरपायली, मानकापूर चक मानकापूर, मेटेगाव, सादागड व हेटी या गावांचा सावली पासून संपर्क तुटलेला आहे. सावली येथे गुरुवारी आठवडी बाजार असतो. या सर्व गावातील लोकांना आठवडी बाजारा करिता सावली येथे जावे लागते. आणि आज चक-मानकापूर येथील राकेश शामराव मडावी व शुभम शामराव मडावी हे दोघे सख्खे भाऊ आपल्या दुचाकीने सावलीला बाजार करीता याच नदीच्या पुलावरून जात होते. अचानक त्यांचा दुचाकीवरील नियंत्रण गेला व ते पुराच्या पाण्यात पडले सुदैवाने त्या दोन्ही सख्ख्या भावंड मृत्युच्या तोंडातून वाचले परंतु त्यांची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या नदीवरील मोठ्या पुलाची मागणी या सर्व गावातील लोक आपल्या लोकप्रतिनिधींकडे सतत करत आहेत परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत या पुलाच्या मागणीची दखलसुद्धा घेतलेली नाही. सहा वर्षाआधी सुद्धा चारगाव येथील चरणदास ढेकलुजी दळांजे या नावाचा एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून मरण पावला. तरीसुद्धा आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ही बाब लक्षात घेतली नाही. व याकडे कानाडोळा करत असतात. दरवर्षी या पुलावर थोड्या-थोड्या पावसात पुराची स्थिती उद्भवत असते. व सतत पूर येत असतो या पुढे कोणत्याही व्यक्तीचा जीव जाणे हे नाकारता येत नाही. व हे पूल सध्या जीव घेणे ठरत आहे. व या पुलामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!