चिमूर शहर बनले दारू चे माहेरघर , पोलीस प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची युवक कांग्रेस ची मागणी पोलीस अधिक्षक यांच्यासह ठाणेदार यांना दिले निवेदन
चिमूर शहर बनले दारू चे माहेरघर , पोलीस प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची युवक कांग्रेस ची मागणी
पोलीस अधिक्षक यांच्यासह ठाणेदार यांना दिले निवेदन
युवक काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष गौतम पाटील
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चंद्रपूर जिल्हा १ एप्रिल २०१५ पासून दारू बंदी जिल्हा घोषित केला असताना मात्र चिमूर शहरात दारू च्या अवैध विक्रेत्यांनी खुलेआम दारू विक्री करणे सुरू केले असल्याने महिलांना त्रास होत असून याची दखल युवक कांग्रेस ने घेतली आणि युवक कांग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष गौतम पाटील यांच्या नेतृत्वात ठाणेदार स्वप्नील धुळे यांना निवेदन देऊन दारू विक्रेत्यावर कारवाई करून दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्हा दारू बंदी घोषित झाला असला तरी बंदी ही कागदा वर असून खुलेआम चिमूर शहरात दारू विक्री सुरू आहे दारूत देशी विदेशी व मोहफुल दारू विक्री ने कळस घातला आहे
चिमूर शहरातील नेताजी वार्ड, गोंड मोहला ,कवडशी ,उमा नदी, वाल्मिक चौक चावडी चौक नेहरू वार्ड आझाद वार्ड इंदिरा नगर,वडाळा (पैकू ),केसलापूर येथे देशी ,मोहफुल व विदेशी दारू विक्री होत आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एका पत्रकार परिषद मधून जाहीर केले. कि ज्या परिसरात दारू विक्री होते तो परिसर दत्तक घेण्याचे व त्या दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते परंतु एक आठवडा संपला तरी पोलीस प्रशासन मात्र चुप्पी साधून आहे कारवाई थातूर मातूर होत आहे. खुलेआम रस्त्यावरून दारू विक्री होत आहे. मात्र याकडे पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे .
चिमूर शहरातील दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करून दारू बंदी करण्याची मागणी युवक कांग्रेस विधानसभा कार्यध्यक्ष गौतम पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर ,पोलीस निरीक्षक चिमूर,विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार खासदार बाळू धानोरकर आमदार किर्तीकुमार भांगडीया जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली असून पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांना निवेदन देत असताना युवक कांग्रेस विधानसभा सचिव मंगेश घ्यार ,अल्पसंख्याक महिला तालुका अध्यक्ष नाजीया पठाण ,युवती कांग्रेस सचिव गीतांजली थुटे, अमृता श्रीकुंडवार, कल्पना बनसोड यशोदा गायकवाड रश्मी डवले, सुषमा खोब्रागडे,वंदना गेडाम , दर्शना वासनिक , शीला रामटेके, व आदी नी दारू बंदी ची मागणी केली असून जर यावर आळा घालण्यात आला नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा पोलीस प्रशासनाला यावेळी देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!