चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटात नुकसानीची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी
चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटात नुकसानीची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी
शुभम पारखी
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर तालुक्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना भात पिकांच्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. आधी निसर्गाने पंधरा ते वीस दिवस कडक उन पडून भाताचे परे वाळविले व त्यामुळे भात पिकाची विस ते पंचवीस टक्के नुकसान झाली. आणि आता अतिवृष्टीमुळे परीसरातील नवतळा, मदनागड, डोंगरगाव बंजी आणि चिमूर तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. जर परत एकदा अतिवृष्टी झाली तर शेत पडीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिवृष्टीमुळे भात पिकाचे परे सडलेले असल्याने
शेत पडीक राहते की काय अशी शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने महसूल विभागाला आदेश देवून पिकांची पाहणी करून चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी. अशी मागणी युवक काँग्रेसचे शुभम पारखी कुंदन भोयर ,शरद सर्मथ ,यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!