विज वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यांना घेराव

विज वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यांना घेराव

भारनियमणाने शेतकरी त्रस्त,


उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - पावसाळा सुरू झाला असला तरी मात्र पाहिजे त्याप्रमानात पाऊस झाला नाही तर मागील दहा दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली आहे त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे  त्यात आनखी भर म्हणजे वीज वितरण कंपनीचे भारनियमन त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन, कापूस व धानाचे परहे कसे जगवायचे या चिंतेत आहे भारनियमना मुळे त्रस्त शेतकऱयांनी सोमवारला चक्क वीज वितरण कंपनी चे कार्यालय गाठून जीप सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला व नंतर भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले .
चिमूर तालुक्यातील विद्युत विभागा अंतर्गत येत असलेल्या सर्व सबस्टेशनमधून लोडशेडिंग सुरू आहे या भागात कमी पावसामुळे दुष्काळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची धान, कापूस,सोयाबीन,व इतर पिके संकटात आले आहेत तर शिंचनाची सोय असलेल्या शेतकरीही आपले पीक वाचवू शकत नाही आहे कारण वीज कंपनी मार्फत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी डबल संकटात सापडला आहे.
         तालुक्यातील जवराबोडी येथील शेतकऱ्यांनि वारंवार तक्रारी करून सुद्धा कार्यालया कडून त्यांना न्याय मिळाला नाही ,व सौर पंपाची सक्ती न करता कृषी पंपासाठी अर्ज करण्याऱ्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी डिमांड द्यावे, यासह सुरू असलेले भारनियमन बंद करावे यासह आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे, व तहसीलदार संजय नागतीलक यांना  देण्यात आले. तर दोन दिवसात या मागण्या निकाली न लागल्यास तीव्र आंदोलन करू अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला यावेळी ,तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष माधवजी बिरजे,माजी तालुका कांग्रेस कमेटी चिमूर अध्यक्ष राम राऊत सर,सहकार नेते संजयजी डोंगरे,जिल्हा कांग्रेस कमेटी सरचिटणीस विजयजी गावंडे,तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, पं. स.उपसभापती शांताराम सेलवटकर,पं. स.गट नेता रोशनभाऊ ढोक,पं. स.सदस्य लताताई पिसे,पं. स.सदस्य नर्मदाताई रामटेके, माजी पं. स.सदस्य ओमभाऊ खैरे,कृ. उ.बा.स.उपसभापती नंदू पाटील गावंडे, विजयजी डाबरे,संजुभाऊ घुटके,विनोद ढाकुनकर,सुधीर जुमडे,रवींद्रजी पंढरे,जोगेंद्रा कडू.हेमंत गुरुपुढे, लक्ष्मण खेडकर,विलासभाऊ पिसे,ज्ञानेश्वरजी राऊत,नानाभाऊ राऊत,वामन महाले, मनोज लेदारे,देवचंदभाऊ,राजेंद्र जिवतोडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!