चिमूर नगर परिषद चा मनमानी कारभार

चिमूर नगर परिषद चा मनमानी कारभार 

नगराध्यक्षाचे मासिक मिटिंग घेण्यास टाळाटाळ


बांधकाम सभापती नितीन कटारे यांचा आरोप


चिमूर - प्रतिनिधी (विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमूर नगर परिषद च्या सत्ताधाऱ्यांनी माहे जून ची मासिक मिटिंग घेतली नसल्याने विविध समस्या प्रश्न सोडविण्यात येत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे मासिक मिटिंग न घेणारे नगराध्यक्ष गोपाल झाडे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी नप बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केली आहे. 
   चिमूर नगर परिषद मध्ये सत्ता कांग्रेस ची असून नगराध्यक्ष गोपाल झाडे तर उपाध्यक्ष तुषार शिंदे असून इतर सभापती पदी भाजपचे नगरसेवक सभापती पदी असल्याने विरोधी पक्षाला डावलून मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नप बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केला असून नगर परिषद ची माहे जुन २०१९ ची मासिक मिटिंग घेतली नसल्याने नप क्षेत्रात आरोग्य विभाग अंतर्गत नाली उपसा करणे घनकचरा व्यवथापन करणे इत्यादी विषय प्रलंबित आहे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत निविदा काढणे ,स्टेशनरी गाळे  हे विषय सुद्धा प्रलंबित आहे बांधकाम विभाग मधील चुरी मुरूम पसरविणे ,रस्ता नाली निविदा आली असून सभेमध्ये मंजुरी देने आहे  तसेच पाणी पुरवठा अंतर्गत वाटर सप्लाय साहित्य ,टँकर पुरवठा,स्टाटर रिपेरिंग स्टाटर पुरवठा विहीर व हातपंप उपसा करणे बोरवेल ओटे बनविणे मोबाईल स्टाटर पुरवठा इत्यादी विषय आहे 
सर्व विषय जनतेच्या हितासाठी असून विषय सोडविण्यासाठी नप च्या मासिक मिटिंग मध्ये ठराव घेणे आवश्यक असताना नगराध्यक्ष मात्र मासिक मिटिंग न घेता गावे फिरण्यात मग्न आहे जनतेच्या हिताच्या प्रश्नाला टाळाटाळ करीत असल्याने जून २०१९ ची मासिक मिटिंग घेतली नसल्याने मनमानी कारभार करीत जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे व मासिक मिटिंग न घेणारे नगराध्यक्ष गोपाल झाडे यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी न.प.बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!