रानडुकराचा हल्लात शेतकरी गंभीर जखमी

रानडुकराचा हल्लात शेतकरी गंभीर जखमी



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


चिमूर : तालुक्यातील मौजा विहिरगाव व विहिरगव(तू) बेलारा येथील तीन व विहिरगाव येथील एक महिला शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २०जुलै रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़
याच बेलरा या गावातील शेतकरी गोवर्धन लक्ष्मण गायकवाड (वय ४८) हे आपल्या स्वतःचा शेता  शेतीमधील काट्या काढण्यासाठी गेले असता विहिरगाव बिट 2 मधील शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. गोवर्धन गायकवाड या शेतक-याच्या मांडीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांची पत्नी सरिता गोवर्धन गायकवाड वय(४५) व त्यांचा शेतात काम करणारी महिला मजूर संगीता गजानन पोहीनकर वय (४० वर्ष)  मजूर धावून येत असल्याने दिसताच रानडुकराने धूम ठोकली़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतक-यास तात्काळ चिमूर येथील रुग्णालयात ग्रामीण रुग्णल्यात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या गोवर्धन ला पुढील उपचारा करीत चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून तसेच विहिरगाव येथील महिला सारस्वती भिवाजी जीवतोडे वय ९० वर्ष या  वृद्ध महिलेला सुद्धा विहिरगाव येथील शेत सर्व न ९२ मध्ये रानटी डुकराने जखमी केले असून सद्या त्या ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती आहेत. जंगली जनावर शेती व मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करत असून शेतातील पिके नष्ट करत असल्याच्या घटनांत वाढ होत आहे़ रानडुकरांमुळे गंभीर जखमी झालेल्या शेतक-याला वनविभागाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे़.
या परिसरात  जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!