किटकनाशक प्राशन करुन शेतक-याची अात्महत्या
किटकनाशक प्राशन करुन शेतक-याची अात्महत्या
मूल (अमित राऊत)
शेतात फवारणी करण्याचे किटकनाशक प्राशन करुन एका शेतक-याने अात्महत्या केल्याची घटना अाज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान तालुक्यातील गोवर्धन येथे घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव सुधीर गजानन हुड (वय ४० वर्ष) असे अाहे.
सुधीर गजानन हुड व त्याचा भाऊ अतूल या दोघां मिळून सोळा एकर शेती अाहे. त्यात धान श्री, तुर अाणि कपाशीचे उत्पादन घेतल्या जाते. अाज सकाळी शेतात पिकांवर फवारणी करताना शेतातच फवारणीचे किटकनाशक प्राशन करुन अात्महत्या केली.
सुधीर वर बचत गट अाणि बंकेचे दिड लाख रु चे पिक कर्ज होते. या चिंतेत तो होता . किटकनाशक प्राशन करुन अात्महत्या केल्याचे माहित होताच त्याला मूल येथिल उप जिला रुग्णालयात भरती करताना उपचारा अाधिच मृत्यु झाला. त्याचे पश्चात अाई पत्नी भाऊ दोन मुली व एक मुलगा अाहे.
शेतकरी मेळाव्या साठी अालेल्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ना. विजय वडेट्टीवार यानी उप जिला रुग्णालयात कुंटुंबीयाची भेट घेऊन सात्वन केले व पंचवीस हजार रु. ची अार्थिक मदत घोषित केली.
उल्लेखनीय म्हणजे जे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे शेतकरी मेळावा होता मेळावा सुरू असतानाच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!