महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई - शाखा चिमूर तर्फे गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई - शाखा चिमूर तर्फे गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई - शाखा चिमूर तर्फे १० वी तथा १२ वी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. हा सोहळा सुप्रसिद्ध असलेल्या चिमुरच्या बालाजी मंदिरातील सभागृहात नुकताच पार पडला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई , कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भैयासाहेब बेहेरे  उपविभागीय अधिकारी चिमूर , तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदिप रामटेके उपाध्यक्ष पूर्व विदर्भ मराठी पत्रकार संघ , सुनिल बोकडे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ चंद्रपूर ,  जितेंद्र चोरडिया कार्याध्यक्ष चंद्रपूर , राजू कुकडे सरचिटणीस चंद्रपूर , चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कुकडे , चिमूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी किशोर पिसे , हे व्यासपीठावर उपस्थित होते. 
      उद्घाटकीय कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी बेहेरे बोलताना सांगत होते की, आजचे जग हे स्पर्धेचे युग असून, या स्पर्धेत टिकायचे असेल तर दुसऱ्याला ९९ टक्के मिळाले तर त्या व्यक्तीची बरोबरी केली पाहिजे आणि स्वतःला १०० टक्के मिळाले पाहिजे असे प्रयत्न करायला हवं तर आपली स्पर्धा हि तिथेच संपते त्या करिता त्या व्यक्तीची बरोबरी न करता स्वतःचीच बरोबरी करा व तेव्हाच शेवटच्या घटकापर्यंत स्पर्धा टिकते. आणि जगायला पण मजा येते. या स्पर्धेत  जीवनात काही तरी बनायचं आहे तर हा उद्देश ठेऊन स्पर्धा करायचा अभ्यास करावे लागेल असे यावेळी सांगितले, तर अध्यक्षीय भाषणात महेश पानसे बोलत होते की, जीवनात व्यक्तीला शिकतांना या इतर गोष्टी करिता खूप अडचणी निर्माण होत येत असतात. पण या येणाऱ्या अडचणीचा सामना करून समोर जाणे म्हणजे हीच स्पर्धा जो या  स्पर्धेत स्पर्धा करायची शिकला तोच या जीवनात टिकला असे आपल्या अध्यक्षिय भाषणात बोलत होते. यावेळी तालुक्यातून बारावी व दहावी प्रथम व द्वितीय आलेल्या गुणवंतांचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावातील १० वी मधील ७४ मुलं मुली व १२ वी मधील २४ अशा एकूण ९८ मुला मुलींना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गैरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी , कार्याध्यक्ष रामदास ठुसे , सरचिटणीस कृष्णकुमार टोंगे , संघटक विलास मोहिनकर , कोषाध्यक्ष सुभाष रामटेके , प्रसिद्धीप्रमुख सूरज नरुले , उपाध्यक्ष प्रमोद राऊत, दामोदर रामटेके , सहसंघटक उपक्षम रामटेके , रोहित रामटेके , गणेश गभने , विकास खोब्रागडे , गुणवंत चटपकार , शुभम पारखी , उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे वेदांत मेहरकुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. कृष्णकुमार टोंगे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!