लोकनेते स्वर्गीय भाई रहिमतुल्ला यांच्या पुण्यतिथि निमित्त तळोधी नाईक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
लोकनेते स्वर्गीय भाई रहिमतुल्ला यांच्या पुण्यतिथि निमित्त तळोधी नाईक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथे आज सकाळी ११ वाजता जेष्ठ समाजवादी लोकनेते स्वर्गीय भाई रहेमतुल्ला यांच्या पुण्यतिथि निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एकता नाट्य कला मंडळ तळोधी नाईक यांचे वतीने करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्याचे गोर - गरीबांचे कैवारी म्हणून ज्यांची ख्याति होती असे लोकनेते स्वर्गीय भाई रहिमतुल्ला यांचे मुळगाव असलेले तळोधी नाईक येथे मागील वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे एकता नाट्य कला मंडळ तळोधी नाईक या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात त्याचाच भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळा तळोधी येथे करण्यात आले आहे तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त गावकरी जनतेनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन तळोधी नाईक चे उप सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर चे संचालक कलीम शेख,एकता नाट्य कला मंडळ तळोधी चे अध्यक्ष नामदेव नंनावरे, रमेश भोयर,किषोर एसाम्बरे,विलास एसाम्बरे, मधुकर वांढरे,माधव वांढरे,हरिश्चंद्र नेवारे,महादेव मेश्राम,नथुजी श्रीरामे, दशरथ खाटे, श्रीराम दांडेकर,बंडू मुरकुटे, शकील शेख,सलीम शेख,विश्वास मेश्राम आदिनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!