वडेट्टीवार अर्थ मंत्र्याच्या स्मार्ट सिटीत गरजले; सत्तेतून चालते व्हा!
वडेट्टीवार अर्थ मंत्र्याच्या स्मार्ट सिटीत गरजले; सत्तेतून चालते व्हा!
मुल( प्रकाश चलाख)
बांधकाम क्षेत्रात भरमसाट काम करून सामान्य जनतेच्या विकासाप्रति उदासीन असणाऱ्या नेत्याला सत्तेवर राहन्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही. त्यामुळे सत्तेतून हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता आपला हक्क बजावेल असा स्पष्ट व सज्जड इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी अर्थमंत्र्यांच्या मुल येथील स्मार्ट सिटीत शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले.
अर्थमंत्र्यांच्या निर्वाचन क्षेत्रातील मुल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एम ए सी पी अंतर्गत आक्शन शेठ व समितीचे स्वनिधीतून ॲक्शन शेड व समितीचे स्वनिधीतून ॲक्शन शेड बांधकामाचा लोकार्पण सोहळा व भव्य शेतकरी मेळावा बाजार समितीतर्फे आयोजित केला होता या कार्यक्रमाला नामदार श्री विजय वडेट्टीवार, खासदार श्री बाळू धानोरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष रावत व इतर काँग्रेसचे गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलताना विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य नामदार विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटनपर भाषणात भाजपाचा भरपूर समाचार घेतला. भाजपा सामान्य जनतेच्या हक्का प्रति उदासीन असून त्यांना जनतेशी कसलेला देने- घेणे नाही. सते बाहेर असताना एक बोलायचे आणि सत्तेवर असतांना विसरून जायचे अशी भाजपाची दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसच्या काळामध्ये 17 हजार वनपट्टे दिलेले आहे . शेतकऱ्यांना काँग्रेसच्या काळात समाधान कारक हमीभाव दिलेला आहे. परंतु आजचे सरकार खर्चाच्या तुलनेत 1 850 रुपये हमीभाव देऊन शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटत आहे. आम्ही सत्तेवर आल्यास त्याला योग्य तो हमीभाव देऊ अशी ग्वाही त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. कर्जमाफी बद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की अजूनही महाराष्ट्रातील तीस लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत.वेगळा विदर्भ बाबत आमची भूमिका ठाम आहे. सत्तेवर नसताना विदर्भातील भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते की वेगळा विदर्भ करू परंतु त्यांनीच आज या प्रकरणाला वेगळी कलाटणी दिली आहे. हूमन प्रकल्पाबद्दल बोलायचे झाले तर सुधीर मुनगंटीवार आमदार असताना विधानसभेत गर्जून सांगत होते की हुमन प्रकल्प पूर्ण करणार परंतु ते आज हूमन प्रकल्पाबाबत" हु" शब्दही बोलण्यास तयार नाहीत. फक्त रस्ते बांधकाम यापलीकडे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कुठलेही काम केलेले नाही. जिल्ह्यात अनेक समस्या प्रलंबित असून त्यांनी बांधकाम क्षेत्र पलीकडे विकासाच्या नावावर कुठलेही मोठे काम शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खासदार पाठोपाठ आमदारांचाही विकेट पडेल असा स्पष्ट व सज्जड इशारा श्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर सभेतून दिला.
ईव्हीएम मशीन बाबत त्यांनी बोलताना सांगितले की ,ईव्हीएम मशीन बाबत अजूनही गोड बंगाल आहे. मत मारायचे काँग्रेसच्या उमेदवाराला आणि मत जातो भाजपाचे उमेदवाराला .त्यांनी याप्रसंगी नागपूर येथील ताजबाग इथले उदाहरण दिले. ताजबाग नागपूर येथे अल्पसंख्यांक समुदाय असून 60 टक्के मते ही नितीन गडकरी यांना मिळाली तर 40 टक्के मते ही काँग्रेसचे नितीन पटोले यांना मिळाली. ही मते ईव्हीएम च्या गडबडी मधून मिळाली आहेत. असे माझे स्पष्ट मत आहे .त्यामुळे त्यांनी ईव्हीएम बाबत शंका निर्माण केली. निवडणूक घ्यायची असेल तर बॅलेट पेपरवर घ्यावी अशी सरकारला विनंती केली. चंद्रपूर वनी आर्नि लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे श्री. बाळू धानोरकर विजयी झाले. त्यांना एक लाखाच्या वर म ताधिक्य हवे होते परंतु 45 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. भाजपा सरकारने गरिबांच्या घरात राकेलं वर पेटत असलेल्या चूली बद्दल नाराजी व्यक्त केली . घरी चूल पेटविण्यासाठी राकेलंचा वापर केला जातो परंतु सरकारने राकेलं बंद केल्यामुळे गोरगरिबांना चूल पेटवणे कठीण झाले आहे याबाबत सरकार प्रति तीव्र नाराजी प्रकट केली.
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संतोष रावत बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे भावी उमेदवार असतील असे त्यांनी आजच्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी स्पष्ट केले.
चंद्रपूर वनी आर्नि लोकसभा मतदारसंघातून नवनियुक्त काँग्रेसचे एकमेव खासदार श्री बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आणून बेरोजगारीची समस्या कायमची हद्दपार करू. व विकासा प्रति अधिक जागरूक राहून सामान्य जनतेच्या हिताशी संबंधित कामे करीत राहीन असे त्यांनी सत्कार मूर्ती पदावरून बोलताना कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त केले. मुल येथील मा दुर्गा माता मंदिराला 25 लाख रुपये खासदार निधीतून देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संतोष रावत यांनी मुल तालुक्यातील समस्यांचा लेखाजोखा मांडला .वनपट्टे, डुकरांचा बंदोबस्त ,झोपडपट्टी प्रश्न इत्यादी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची विनंती नवनियुक्त खासदार श्री बाळू धानोरकर यांच्याकडे केली.
कार्यक्रमाप्रसंगी मूल तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी महेश कटकमवार, ज्ञानेश्वर बोरकर, शामराव वाढई, प्रभाकर लेनगुरे ,गणेश वाढई ,शालिक मु नगा डे, यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य श्री विजय वडेट्टीवार व नवनियुक्त खासदार श्री बाळूभाऊ धानोरकर चंद्रपूर वनी आणि लोकसभा मतदारसंघ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे घनश्याम मुलचंदानी, नंदू नागरकर ,प्रकाश पाटील मारकवार , डी आर खाडे, एस एम तू पट ,संजय मारकवार, राकेश रत्ना वार, राजेंद्र कन्नमवार ,डॉ. पद्माकर लेनगुरे, पुरुषोत्तम भुरसे ,घनश्याम येनुरकर, संदीप कारमवार व संचालक मंडळाचे सदस्य गण, काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री संजय पडोळे यांनी केले ,प्रास्ताविक घनश्याम येनुरकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुल व आभार प्रदर्शन संजय मारकवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुल यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!