शासकीय औ.प्र.संस्थेत जागतिक कौशल्य दिन संपन्न
शासकीय औ.प्र.संस्थेत जागतिक कौशल्य दिन संपन्न
कौशल्य प्राप्त करून स्वयंरोजगाराकडे वळावे -
प्राचार्य अनंत सोमकुंवर
गडचिरोली (प्रतिनिधी ) प्रशिक्षणार्थांनी कौशल्ययुक्त व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे , असे प्रतिपादन प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोमकुंवर यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक कौशल्य दिनाचे आयोजन कर्मशाळेत करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी तथा यशस्वी वेल्डींग वर्कशाप संचालक विलास बावणे , गटनिदेशक आनंद मधुपवार , निदेशक पि.एन. भैसारे आदींनी या दिनानिमित्ताने स्वानुभव प्रकट केले. प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम तर सूत्रसंचालन संतोष बोंदरे यांनी केले. या कार्यक्रमात रक्तदान करणारे तसेच रासेयोच्या यशस्वी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र अतिथीच्या हस्ते वितरण करण्यात आले. कु.पुजा कर्मकार , अंजली पवार, पुजा सातपुते , श्रुती मानकर, रानी येसनसुरे आदी प्रशिक्षणार्थांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास कर्मचारी वृंद तसेच प्रशिक्षणार्थांची उपस्थिती होती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!