आप-प्रहार च्या चिघळलेल्या आंदोलनाचा प्रभाव, रेतीघाटावरील ठेकेदारांना तंबी
आप-प्रहार च्या चिघळलेल्या आंदोलनाचा प्रभाव, रेतीघाटावरील ठेकेदारांना तंबी
शुभम बारसागडे / नेरी (चिमूर):
लोकप्रतिनिधी आणी प्रशाशनाच्या निष्काळजी पणाने मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब आणी दुर्लक्षित असलेल्या अर्हेर नवरगाव ते ब्रम्हपुरी रस्त्याच्या दुरुस्ती साठी अनेक वेळा निवेदन देवून आणी आंदोलनाचा इशारा देवूनही कुठलेही ठोस काम केले नव्हते. शनिवार दि. ०६ जुलै रोजी आप-प्रहार तर्फे अर्हेर नवरगाव येथे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन उभारले, आंदोलनाची अग्रीम सूचना देवूनही प्रशाशनाने सुरुवातीला गावकऱ्यांच्या हाकेला कानाडोळा केला. लोकप्रतिनिधी आणी प्रशाशानाकडून वारंवार होत असलेल्या आश्वाशनाला लोक कंटाळले होते, अतिशय खराब झालेल्या रस्त्यामुळे मागील काही वर्षांपासून या परिसरातील बस सेवा बंद करण्यात आली होती, आजही शाळेतील मुलांना दूरपर्यंत पाणी-पावसात सायकल ने जावे लागत आहे, तरीही प्रशाशन आणी लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरणे भाग पडले.
आप-प्रहार च्या या आंदोलनाला गावकऱ्यांनी चांगली साथ देत प्रशाशनाला धारेवर धरले. प्रशाशनाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या उडवा-उडवी च्या उत्तराने लोकांमध्ये संतापाची लाट उठली होती. रेतीघातातील वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, दररोज होत असलेले लहान-मोठे अपघात यामुळे संतापलेल्या लोकांनी आपला मोर्चा रेतीघाटाकडे वढविला. रेतीघाटावर मिळालेल्या माहिती नुसार, रेती ठेकेदारांनी रस्त्याच्या डागडूगी कडे पूर्ण दुर्लक्ष केले असे निदर्शनास आले तसेच रेती विषयक वाहतुकी मध्ये अनेक अफरातफरी असल्याचे समोर आले. हे सर्व प्रकार लोकांनी प्रशाशनाच्या प्रतिनिधींनी समोर ठेकेदारांना निदर्शनात आणून दिले आणी लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्यात यावी यासाठी तंबी देण्यात आली. चिघळलेल्या प्रकरणामुळे रेती ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणी प्रशाशनाची झोपमोड झाली आणी झालेल्या प्रकरणाची दखल घेत त्वरित कार्यवाही करण्यात आली.
प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात उभारलेल्या या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी एडो. हेमंत उरकुडे, सुरेशजी कोल्हे, हरीश्चन्द्र ठेंगरे, आदित्य पिसे, प्रशांत दानी, रामपाल तुपट, होमराज राऊत, वामन निसार, तानबाजी चोले व अर्हेर नवरगाव परिसरातील समस्त गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!