जीएमआर कपंनिने बस सुविधा विद्यार्थ्यानंसाठी पूर्ववत सुरू ठेवावी

जीएमआर कपंनिने बस सुविधा विद्यार्थ्यानंसाठी पूर्ववत सुरू ठेवावी

स्कूल बससाठी विद्यार्थ्यांचे कंपनी समोर ठिय्या आंदोलन


वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्टे)


वरोरा : -  जी.एम.आर. वरोरा एनर्जी लि. कंपनीने मागच्या सत्रात वरोरा येथे शिक्षण घेणाऱ्या  दहेगाव, डोंगरगाव येथील ८ ,९ व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा सुरू केली होती. यावर्षी मात्र शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन सुद्धा जीएमआर कंपनीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी जीएमआर कंपनी  समोर ठिय्या आंदोलन पुकारून कंपनीच्या विद्यार्थी विरोधी धोरणा विरुद्ध नारेबाजी करून आपला रागव्यक्त केला. कंपनीने तात्काळ स्कूल बस सेवा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,  अन्यथा  कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा  इशारा दहेगाव ग्राम पंचायत चे सरपंच विशाल पारखी यांनी दिला आहे.
         अधिक माहितीनुसार दहेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात जीएमआर कंपनी उभी असून सामाजिक बांधिलकीचा विचार करून जीएमआर कंपनीने मागच्या सत्रात डोंगरगाव, दहेगाव येथील ८ , ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वरोरा येथील शाळेत शिक्षण ग्रहण करण्यासाठी कंपनी तर्फे बस सुविधा उपलब्ध करून दिली होती. मागचे सत्र संपल्यानंतर ती सेवा बंद झाली.२०१९ - २०  ह्या नवीन सत्राच्या सुरुवातीला  कंपनी  विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बस सेवा सुरू करेल असा विद्यार्थी व ग्राम वासियांना विश्वास होता. परंतु शाळेच्या सत्राला सुरुवात होऊन १५ - २० दिवस लोटल्यानंतरही कंपनीतर्फे या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. दहेगाव ग्रामपंचायत मार्फत कंपनीला निवेदन देऊन बस सेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली . सामाजिक बांधिलकीचा आव आणणाऱ्या कंपनीतर्फे जाणून-बुजून हा प्रकार घडत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.  शैक्षणिक सत्र  सुरू झाल्या नंतरही कंपनी आपल्या सामाजिक बांधिलकी पासून दूर पळत असल्याने कंपनीला आपल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी अखेर संतप्त विद्यार्थी व गावकऱ्यांनी कंपनीवर आपला मोर्चा नेला, कंपन्या गेट समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन पुकारले व कंपनीच्या विरोधात नारेबाजी केली. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी, पालक वर्ग व दहेगाव, डोंगरगाव येथील नागरिक उपस्थित होते.
कंपनी तर्फे बस सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या मागणीवर कंपनी ने विचार केला नाही तर त्यांच्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.

                  विशाल पारखी
                        सरपंच
              ग्राम पंचायत, दहेगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!