शेतावर जाण्यास अडथळा महसूल प्रशासनाणे केले चौकशी करण्यास विलंब
शेतावर जाण्यास अडथळा महसूल प्रशासनाणे केले चौकशी करण्यास विलंब
नापिकी झाल्यास शेतकऱ्याने दिला आत्महत्या करण्याचा इशारा
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील मौजा तुकुम येथील सांजा मासळ मधील मंदा देविदास निखाडे यांचे मालकीचे कोरडवाहू शेत असून त्यांच्या लगत असलेले शेतीमालक मंदा मत्ते यांची शेती असून त्यांचा मुलगा देवानंद मत्ते हा वहिवाट वरून जाण्यास नेहमी अडथळा निर्माण करीत असल्याने शेतीची मशागत करणे कठीण झाले असून समोर नापिकी झाल्यास आत्महत्या हाच पर्याय उरलेला असल्याचे अन्यायग्रस्त पुरुषोत्तम निखाडे यांनी सांगितले असून महसूल प्रशासन अर्ज करून ही दुर्लक्ष करीत आहे तेव्हा तात्काळ चौकशी करून वहिवाट पूर्वरत करून देण्याची मागणी केली आहे.
चिमूर तालुक्यातील मौजा तुकुम येथील मंदा पुरुषोत्तम निखाडे यांची कोरडवाहू शेती मासळ खुर्द शेतशिवारात असून त्यांच्या शेतीत पराटी पीक उभं असून मशागत करण्यासाठी वहिवाट असलेल्या वहिवाट वरून जाण्यास देविदास मत्ते विरोध करून अडथळा निर्माण करीत असून वहिवाट रस्त्यावर काट्या गाडून ठेवल्याने मशागत करण्यास कठीण झाले आहे न्याय मिळण्यासाठी महसूल प्रशासन ला वारंवार अर्ज करून ही ते मात्र दुर्लक्ष करीत आहे मशागत करण्यासाठी जात असताना देविदास मत्ते सोबत भांडण झाले असून धमकी मुळे भीती निर्माण झाली आहे.
याबाबत पोलीस स्टेशन चिमूर ला सुद्धा तक्रार केली आहे.तहसील कार्यालयात जाऊन सुद्धा लक्ष दिल्या जात नाही तलाठी दडमल सुद्धा कारण सांगून चौकशी पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहे.
शेतात पराटी पीक उभे असून पुढील मशागत करणे आवश्यक असून परंतु देविदास मत्ते वहिवाट रस्त्यावर काटेरी कुंपण केले असल्याने बंडी नांगर नेणे कठीण झाले असून समोर मशागत न झाल्यास नापिकी होईल आणि सोसायटी चे कर्ज फेडणे होणार नाही तेव्हा आत्महत्या करणे कडे मार्ग राहील महसूल प्रशासन ने तात्काळ दखल घेत मंदा निखाडे यांना वहिवाट पूर्वरत सुरू करून देण्याची मागणी शेतीमालक मंदा निखाडे व पुरुषोत्तम निखाडे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!