महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा - चिमूर तर्फे उदया गुणवंत विद्यार्थींचा सत्कार सोहळा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा - चिमूर तर्फे उदया गुणवंत विद्यार्थींचा सत्कार सोहळा

आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती


जांभुळघाट : - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )                                 

     
जांभुळघाट : - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा मुंबईशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा - चिमूर अंतर्गत चिमूर तालुक्यातील प्रत्येक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी तसेच १२ वी तील प्रथम व व्दितीय आलेले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन दिनांक.२१/०७/२०१९ ला स्थळ बालाजी देवस्थान चिमूर येथे आयोजण करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुणवंत पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष धनराज मुंगले सामाजिक कार्यकर्ते व माजी तालुका अध्यक्ष भाजपा, कार्यक्रमाचे सहउद्घाटक अरविंद रेवतकर उपाध्यक्ष कांग्रेस पक्ष चंद्रपूर, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भैयासाहेब बेहेरे उपविभागीय अधिकारी चिमूर, संजय नागतीलक तहसीलदार चिमूर, डॉ. गो.वा.भगत वैद्यकीय अधिक्षक चिमूर, स्वप्नील धुळे पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन चिमूर, मनोज गभने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भिसी, अँड. भाविक चिवंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग चिमूर, प्रदीप रामटेके उपाध्यक्ष पूर्व विदर्भ मराठी पत्रकार संघ मुंबई, सुनील बोकडे अध्यक्ष चंद्रपूर महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, वसंतभाऊ वारजूरकर जेष्ठ नेते भाजपा, जितेंद्र चोरडीया कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपूर, राजू कुकडे सरचिटणीस महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ चंद्रपूर इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार संघ शाखा चिमूर तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!